प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं हृदय विकाराच्या झटक्याने झाले आहे. मुनव्वर राणा यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर यांच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी रात्री उशीरा लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात त्यांची प्राणज्योज मालवली. (Latest Marathi News)
मागील वर्षापासून मुनव्वर राणा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना लखनऊतील अपोले रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राणा यांची तब्येत आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
राणा यांची मुलगी आणि सपा नेत्या सुमैया राणा यांनी सांगितलं की, माझे वडील मुनव्वर राणा यांची तब्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून खराब होती. डायलिसिस करताना त्यांचं पोट दु:खू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पित्ताशयाची त्रास होता. यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र, तरीही त्यांचा तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२०२२ साली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होण्याआधी म्हटलं होतं की, 'योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडेल. दिल्ली किंवा कोलकाता येथे जाईल'. तर 'सबका साथ सबका विकास'चा कोणताच विकास झालेला नाही. दिल्ली, कोलकाता आणि गुजरात अधिक सुरक्षित आहे'.
मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि अवधी भाषेत कविता लिहायचे. मुनव्वर राणा यांनी वेगवेगळ्या शैलीत गझलांचं प्रकाशन केलं आहे. २०१४ साली त्यांना उर्दू साहित्यासाठी २०१४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
तसेच २०१२ साली त्यांना 'माटी रतन सम्मान' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मुनव्वर यांनी एका वर्षानंतर पुरस्कार सरकारला परत केला होता. तसेच त्यांनी वाढत्या असहिष्णुतेमुळे कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारण्याची शपथ घेतली होती'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.