Police Complaint Against Jethalal Saam TV
मनोरंजन बातम्या

Jethalal In Trouble: आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याने जेठालाल अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?

Dilip Joshi: जेठालाल म्हणजे दिलीप जोशी मालिकेमुळे अडचणीत आले आहेत.

Pooja Dange

Tarak Mehta Ka Oolta Chashma:

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टीव्ही जगतातील खूप लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र अनेकांच्या आवडीचं आहे. जेठाला नेहमीच कोणत्या कोणत्या अडचणीत सापडतो. त्यामुळे संपूर्ण गोकुळधाम सोसायटी त्रास सहन करावा लागतो.

मालिकेत अडचणीत सापडणाऱ्या जेठालालच्या खऱ्या आयुष्यात देखील असेच काहीसे घडले आहे. जेठालाल म्हणजे दिलीप जोशी मालिकेमुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिलीप जोशी यांच्या विरोधात २०१६ साली आदिवासी समाजाने एक पात्र दिलं होतं. मालिकेच्या माध्यमातूम आदिवासी समाजच्या भावना दुखावल्या गेलूया असल्याचे म्हटले होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने हे पात्र विलेपार्ले पोलीस ठाण्यात दिले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ई टीव्ही भारत यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते दिलीप जोशी यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आदिवासी समाजाची लेखी माफी मागितले आहे. दिलीप जोशी यांनी मालिकेत (Serial) साकारलेल्या एका पात्रामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे पत्रात म्हटले होते. तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने अभिनेते दिलीप जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखवा अशी मागणी सुद्धा पत्रात केली होती.

विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नार्वेकर यांनी हा वाद खूप वाढू न देता अगदी काळजीपूर्वक हाताळला. पोलिसांनी दिलीप जोशी यांना आदिवासी समाजाची माफी मागण्याची विनंती केली. दिलीप जोशी यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आदिवासी समाजाची माफी मागितली.

ई टीव्ही भारतने जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीप जोशी काय म्हणाले ते वाचा. ''तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये २०१६ मध्ये एक एपिसोड दाखविण्यात आला होता. गणपती उत्सव साजरा करतानाच हा एपिसोड होता. या एपिसोडमध्ये आम्ही एक नाटक केलं होतं. या नाटकातील माझ्या एका डायलॉगमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

आमच्या कोणाच्या मनात कधीही असे नव्हते आणि आम्ही कोणत्याही जातीच्या लोकांच्या भावना कधीही दुखावणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या भावना दुखावल्या आहेत तर मी मनापासून तुमची माफी मागतो. यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही. तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे दिलीप जोशी यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT