मनोरंजन बातम्या

Tamil Comedian Mayilsamy Dies: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकमुळे निधन

तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन.

Saam Tv

Tamil Comedian Mayilsamy Dies of Heart Attack: दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी आणखी एक दुःखद बातमी आहे. तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन झाले आहे. टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सालिग्रामम (चेन्नई) येथे अभिनेत्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगितले.

मायिलसामी यांच्या निधनानंतर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच दुःख व्यक्त केले आहे. मायिलसामी सालिग्रामम येथे राहत होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी चेन्नईतील बोरूर येथील जवळच्या रुग्णालयात नेले. पण त्याआधीच त्यांना मृत्युने कवटाळले होते.

मायिलसामी त्यांनी विवेक आणि वडिवेलूसह विनोदी कलाकारांसोबत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कांचना (2011), वेदालम (2015), गिली (2004), वीरम (2014), कांचना-2 (2015), कासू मेला कासू (2018) यासह विविध चित्रपटांमध्ये मायलासामीने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मायलासामी यांनी 2021 साली विरुगंबक्कम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मायिलसामीन हे केवळ विनोदी कलाकारच नव्हते, तर त्यांनी अनेक अप्रतिम भूमिकाही साकारल्या होत्या. मायलसामी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो देखील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT