singer david clayton thomas  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death: संगीत विश्वातील प्रसिद्ध आवाज हरपला; ज्येष्ठ गायकाचे अल्पशा आजाराने निधन

Singer Death: ग्रॅमी विजेते आणि 'ब्लड, स्वेट अँड टीअर्स' बँडचे प्रमुख गायक डेव्हिड क्लेटन-थॉमस यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली.

Shruti Vilas Kadam

Singer Death: संगीतविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. १९६० आणि ७० च्या दशकात आपल्या दमदार आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे प्रसिद्ध गायक डेव्हिड क्लेटन-थॉमस यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जागतिक संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

डेव्हिड क्लेटन-थॉमस यांच्या पीआरने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. बुधवारी संध्याकाळी टोरंटो येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संगीतविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे.

डेव्हिड क्लेटन-थॉमस यांना खरी लोकप्रियता अमेरिकेतील प्रसिद्ध रॉक बँड ब्लड, स्वेट अँड टीअर्सचे मुख्य गायक म्हणून मिळाली. या बँडने १९७० मध्ये दोन प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार पटकावले. त्यांच्या गायकीमुळे या बँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. गायनासोबतच ते एक उत्कृष्ट गीतकारही होते. त्यांनी लिहिलेले 'स्पिनिंग व्हील' हे गाणे १९६९ मध्ये बिलबोर्ड हॉट १०० चार्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. तसेच 'व्हेन आय डाय' आणि 'यू हॅव्ह मेड मी सो व्हेरी हॅपी' ही त्यांची गाणीही प्रचंड गाजली

१३ सप्टेंबर १९४१ रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या डेव्हिड यांचे वडील कॅनेडियन सैनिक होते. १९६६ मध्ये त्यांनी 'ब्रेनवॉश' हे युद्धविरोधी गाणे लिहून रेकॉर्ड केले. हे गाणे कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरले आणि त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानले जाते. बँडपासून वेगळे झाल्यानंतरही डेव्हिड यांनी यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांनी १२ हून अधिक अल्बम प्रदर्शित केले आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा कॅनेडियन म्युझिक हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्यांच्या निधनाने संगीतविश्वाने एक अष्टपैलू गायक, गीतकार आणि प्रेरणादायी कलाकार गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT