Famous Actress Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली, सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Actress Passed Away : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले.

वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री नादिया फारेस यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 'द क्रिमसन रिव्हर्स' (The Crimson Rivers) या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या फ्रान्स अभिनेत्री नादिया फारेस यांचे रविवारी निधन झाले.

thehollywoodreporter च्या वृत्तानुसार, नादिया फारेस गेल्या आठवड्यात पॅरिसमधील एका स्विमिंग पूलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तेव्हापासून त्या कोमात होत्या, अशी माहिती त्यांच्या मुलींनी 'एजन्सी फ्रान्स-प्रेस'ला दिली.

"अतिशय जड अंतःकरणाने आम्ही हे जाहीर करत आहोत की, या शुक्रवारी (17 एप्रिल 2026) नादिया फारेस यांचे निधन झाले आहे" , असे सिलिया आणि शाना चासमन यांनी एका निवेदनाद्वारे माध्यमांना सांगितले. "फ्रान्सने एक महान कलाकार गमावली आहे; परंतु आमच्यासाठी, आम्ही ज्यांना गमावले आहे, ती आमची आई आहे..."

अभिनेत्रीच्या मुलीने इन्स्टाग्रामवर आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली ती म्हणाली की, "हे असे एक हृदयद्रावक दुःख आहे, ज्यातून मी कधीच सावरू शकणार नाही. दररोज सकाळी जाग आल्यावर मी अशी प्रार्थना करते की, हे केवळ एक दुःस्वप्न असावे आणि आई तु आमच्यासोबत असावी. तू कायम आमच्यासाठी लढा दिला आहे. तुझे खूप आभार. मला हे जीवन दिल्याबद्दल आभार; प्रत्येक आठवणीबद्दल आभार; त्या हास्याच्या क्षणांसाठी आणि त्या रडण्याच्या क्षणांसाठीही आभार..." नादिया फारेस यांच्या पश्चात त्यांच्या मुली, सिलिया आणि शाना चासमन आहेत.

अभिनेत्रीचे करिअर

नादिया फारेस यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात १९९० मध्ये,'नवारो' (Navarro) या टिव्ही मालिकेतील एका भागातील छोट्या भूमिकेद्वारे केली. दोन वर्षांनंतर, 'माय वाइफ्स गर्लफ्रेन्ड्स' (My Wife’s Girlfriends) या चित्रपटाद्वारे फारेसने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये 'टेल मी येस...' (१९९५), 'द क्रिमसन रिव्हर्स' (२०००), 'वॉर' (२००७), 'मार्से' (२०१६-२०१८), 'लुथर' (२०२१) आणि 'तुजूर पॉसिबल' (२०२५) यांचा समावेश होतो.फारेसने २००२ मध्ये निर्माता स्टीव्ह चासमन यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि २००९ मध्ये जेव्हा ती आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेत राहायला गेली, तेव्हा तिने अभिनयातून ब्रेक घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT