Manasvi Choudhary
'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले.
मालिकेतील तिच्या संजना या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. रूपालीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
मराठमोळ्या लूकमध्ये आता पुन्हा रूपालीने फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत.
रूपालीच्या मनमोहक सौंदर्याचे नेटकरी कौतुक करत आहेत.
अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या कामातून वेळ काढत खास फोटोशूट करत असते.
सोशल मीडियावर रूपालीचा चाहतावर्ग मोठा आहे. ती नेहमीच वेगवेगळे फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांना अपडेट देत असते.
या फोटोशूटसाठी रूपालीने हिरवी साडी नेसली आहे. पारंपारिक अंदाजात तिने कानातले, गळ्यातले, पायात पैंजण घातले आहेत.
नाकात नथ आणि केसांचा अंबाडा तिने घातला आहे. तिचं सौंदर्य खुपच सुंदर दिसत आहे.