Gautami Patil Program Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, दगडफेकीमध्ये तरुण जखमी

Gautami Patil Dance Program In Latur: गौतमी पाटीलचे सध्या राज्यभर कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात (Gautami Patil Program) राडा होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अशामध्ये लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाडी करत राडा केला.

Priya More

Gautami Patil Program:

'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणजेच नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला तर गर्दी आलीच. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठी गर्दी करतात. गौतमीचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी ही गर्दी होत असते. गौतमी पाटीलचे सध्या राज्यभर कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात (Gautami Patil Program) राडा होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात.

अशामध्ये लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाडी करत राडा केला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर पोलिसांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद पाडला. तिच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचे लातूरच्या उदगीरमध्ये आयोजन करण्यात आले होते. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हणून लातूरकरांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला फक्त नागरिकच नाही तर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजप जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात खूपच मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मागे बसलेल्या प्रेक्षकांना गौतमी पाटील व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे कोणितरी पाठीमागून दगड फेकून मारला. दगड लागल्यामुळे एक तरूण जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. यावेळी काही तरूणांनी गौतमीचा डान्स व्यवस्थित पाहता यावा यासाठी नेत्यांचे बॅनर फाडून टॉवरवर चढले. अयोजकांनी यावेळी या तरुणांना खाली उरतण्यास सांगितले पण त्यांनी काही ऐकले नाही. या कार्यक्रमात काही तरुणांनी राडा देखील केला. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यानंतर काही वेळातच गौतमीचा कार्यक्रम बंद करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT