प्रसिद्ध अभिनेत्री कुटुंब आणि करिअर सोडून संन्यासी बनली आहे.
अभिनेत्री टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा होती.
अभिनेत्रीच्या दमदार अभिनयाने तिने अनेक मालिका विश्व गाजवले आहे.
मनोरंजनसृष्टीत आपले करिअर करण्यासाठी अनेक लोक ग्लॅमरस जगात प्रवेश करतात. काहींना यश मिळते तर काही लोक आपली वाट बदलतात. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री नुपुर अलंकारने देखील टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडून संन्यासी झाली आहे. नुपुर अलंकार (Nupur Alankar ) टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा होती. पण काही वर्षांपूर्वी तिने सर्वकाही सोडून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार , नुपुर अलंकार अभिनय क्षेत्रात असताना देखील तिची आध्यात्मिक साधना चालू होती. तिची आई आजारी होती. पैशांच्या कमतरतेमुळे तिला उपचार घेता आले नाहीत. नुपुर अलंकारची आई हिच तिची शेवटची जबाबदारी होती. त्यामुळे आईच्या निधनानंतर तिने संन्यास (धार्मिक जीवन) स्वीकारले. एकेकाळी ग्लॅमरस आयुष्य जगणारी नुपुर अलंकार आता संन्यासी म्हणून भिक्षा मागते.
नुपुर अलंकारने 30 वर्षांहून अधिक काळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम केले आहे. नुपुर अलंकारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये गाजलेली पात्र साकारली आहेत. नुपूर अलंकारने 2022 मध्ये अभिनय क्षेत्र सोडून संन्यासी जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार , गुरु शंभू शरण यांच्या मार्गदर्शनाखाली तिने संन्यास घेतला.
100 च्यावर टिव्ही शो मध्ये नुपुर अलंकार झळकली आहे. तिने स्पष्ट केले की, तिचा नेहमीच अध्यात्माकडे कल होता. माझ्यासाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया होती.इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय तिच्यासाठी अजिबात कठीण नव्हता. आईच्या निधनानंतर तिला लोकांपासून अलिप्त रहावेसे वाटू लागले. संन्यास घेणे कठीण नाही. तिला जीवनाचे सत्य खूप कळले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.