Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "तुझा ब्लाउज काढ..."; ऑडिशन सुरू असताना अभिनेत्रीकडे अश्लील मागणी, भयंकर घटना वाचून धक्काच बसेल

Actress Casting Couch Incident : प्रसिद्ध अभिनेत्री कास्टिंग काउचचा शिकार झाली. अभिनेत्रीने १६ व्या वर्षी तिच्यासोबत घडलेली भयंकर घटना सांगितली.

Shreya Maskar

ऑडिशन सुरू असताना अभिनेत्रीकडे अश्लील मागणी

अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये केलंय काम

अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

कास्टिंग काउच ही इंडस्ट्रीतील काळी बाजू आहे. आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले भयंकर कास्टिंग काउचच्या घटना सांगितल्या आहेत. आताही अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुस्कान वर्ष्णेयचा नुकताच 'जीना दिल से' हा हिंदी चित्रपट रिलीज झाला. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

मुस्कान वर्ष्णेयने तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि कास्टिंग काउचबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'फिल्मी मंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कानने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काउचची घटना सांगितली. अभिनेत्री म्हणाली, "मी खूप नशीबवान आहे की, कोणीही मला कधीही थेटपणे वाईट किंवा अपमानकारक काहीही म्हटले नाही. मात्र, मला काही विचित्र मागणी आल्या आहेत. मी फक्त १६ वर्षांची होते. संगीत क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यक्तीने माझ्याशी थेट संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की त्यांना माझ्यासोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट करायचा आहे, वगैरे. मी त्या व्यक्तीचं काम बघत मोठी झाले होते, त्यामुळे मला वाटलं, 'व्वा, ही खूप चांगली संधी आहे... मग तो म्हणाला, 'तुम्ही गाझियाबादमध्ये राहता आणि मी दुसऱ्या शहरात, त्यामुळे फक्त एका ऑडिशनसाठी इथपर्यंत प्रवास करणे तुमच्यासाठी खूप थकवणारा असेल, त्यामुळे आपण व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर ऑडिशन घेऊया."

पुढे अभिनेत्री म्हणाली," तेव्हा व्हिडिओ कॉल ऑडिशन सुरू झाले. ते म्हणाले, "आम्हाला तुम्हाला पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायचं आहे. सूट, साडी, किंवा असं काहीतरी..." म्हणून मी एक सूट घालून पाहिला आणि मग ते म्हणाले, "ठीक आहे, आता तुम्ही साडीमध्ये कशा दिसता ते आम्हाला दाखवा..." इथपर्यंत सगळं काही अगदी सामान्य आणि नेहमीचं वाटत होतं... विशेषतः मी अजूनपर्यंत इन्स्टाग्रामवर सूट किंवा साडीमध्ये कोणतेही फोटो पोस्ट केले नसल्यामुळे, मला वाटलं की त्यांना फक्त मी त्यात कशी दिसते हेच पाहायचे आहे. एकदा मी साडी नेसल्यावर, त्यांनी मला नेहमीच्या पोझेस द्यायला सांगितल्या... आम्हाला तुमची उजवी बाजू दाखवा, डावी बाजू, आता समोरून, वगैरे..."

अनुभव सांगताना शेवटी अभिनेत्री म्हणाली, "त्यापुढे ते बोले, 'ठीक आहे,आता तुमचा ब्लाउज काढा...' मी थक्क झाले... हा माणूस बॉलिवूडमधील एक मोठा सेलिब्रिटी आहे. व्हिडिओ कॉलवर त्याची संपूर्ण टीम नव्हती; तो एकटाच होता. म्हणून मी विचारलं, 'का? मला माझा ब्लाउज काढायची काय गरज आहे?' आणि तो म्हणाला, 'नाही, नाही! मला फक्त बघायचं आहे की त्यामुळे कसा 'ऑफ-शोल्डर' लुक येतो.' 'तुम्हाला काहीही दाखवण्याची गरज नाही; तुम्ही तुमचा पदर तसाच ठेवू शकता. मला फक्त तो लुक द्या. तो एकंदरीत फील...तेव्हा मी म्हणाले, 'थांबा मी जाऊन ऑफ-शोल्डर ब्लाउज घालू का? तुम्हाला खरंच तेच बघायचं आहे का?' तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला आणि मग म्हणाला, 'ठीक आहे, ठीक आहे, मला दुसऱ्या कॉलवर जायचं आहे...असं बोलून व्हिडिओ कॉल बंद केला..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT