Famous Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : 'तुला निळ्या ड्रममध्ये टाकेन', प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी

Famous Actor Received Death Threats : प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. दिव्या दत्ताची वेब सीरिज 'चिरैया' सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही सीरिज २० मार्च २०२६ रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. 'चिरैया' शशांक शाह दिग्दर्शित आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत प्रसन्न बिष्ट, सिद्धार्थ शॉ झळकले आहेत. 'चिरैया'चा मुख्य अभिनेता सिद्धार्थ शॉला धमक्या मिळाल्या.

'चिरैया'ची कथा

'चिरैया' सीरिजमध्ये वैवाहिक बलात्कार, लग्नानंतर पतीकडून होणारी जबरदस्ती, पुरुष प्रधानता आणि महिलांची संमती यांसारख्या गंभीर विषयांना हात घालण्यात आला आहे. नवरा त्याच्या बायकोसोबत तिच्या परवानगीशिवाय वारंवार लैंगिक संबंध ठेवताना या सीरिजमध्ये दिसते. सिद्धार्थचे पात्र नकारात्मक भूमिकेत चित्रित केले आहे, ज्यामुळे त्याला ऑनलाइन मोठ्या प्रमाणात द्वेषपूर्ण टीकेला सामोरे जावे लागत आहे.याबद्दल अभिनेत्याने नुकतेच भाष्य केले आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, "तुला एका निळ्या ड्रममध्ये टाकायला पाहिजे, असा मेसेज लोक मला पाठवत आहेत..." (मेरठ भीषण हत्याकांडात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली होती. त्यानंतर नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये टाकले होते. )

सिद्धार्थला मात्र या द्वेषाचा, रागाचा आनंद होत आहे. तो पुढे म्हणाला की, "एक पुरुष म्हणून मला जो आता द्वेष मिळत आहे, त्यात सर्व शिव्या आहेत. पण एवढा द्वेष पाहून मला खूप आनंद होतो, कारण त्यामागे केवळ माझ्याबद्दलचे प्रेम आहे. जर कोणाला इतक्या द्वेषाचा सामना करावा लागत असेल, तर याचा अर्थ मी माझे काम व्यवस्थित केले आहे." पुढे मुलाखतीत अभिनेत्याने स्पष्ट केले की, अनेक दृश्यांचे चित्रीकरण करताना त्याला पॅनिक अटॅक आला होता. तसेच मधुचंद्राच्या रात्रीचा सीन करताना सिद्धार्थची अवस्था खूप वाईट होती. तो खूप थरथर कापत होता आणि रडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT