Actor House Robbery saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor House Robbery: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास

Actor House Robbery: दक्षिण अभिनेता रवी मोहन यांच्या चेन्नईतील घरात चोरीप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. रोख रक्कम जप्त झाली असून १० लाखांचा हिऱ्यांचा नेकलेस अद्याप बेपत्ता आहे.

Shruti Vilas Kadam

Actor House Robbery: तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी मोहन यांच्या चेन्नईतील घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. या चोरीत लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लंपास झाल्याचा आरोप असून, चोरीला गेलेल्या सुमारे १० लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या नेकलेसचा अद्याप शोध लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील इंजंबक्कम परिसरातील रवी मोहन यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नीलांगराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घरातील सर्व कर्मचारी, मदतनीस आणि ड्रायव्हर्सची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान संशयाची सुई अभिनेता रवी मोहन यांचा ड्रायव्हर राजेश याच्याकडे वळली.

पोलिस चौकशीत आरोपीने घरातील लॉकरमधून सुमारे २.५ लाख रुपयांची रोकड घेतल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी ती रक्कम जप्त करून रवी मोहन यांना परत दिली. मात्र चोरीला गेलेला अंदाजे १० लाख रुपयांचा हिऱ्यांचा नेकलेस अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपी ड्रायव्हरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चोरीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हरवलेल्या नेकलेसची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे रवी मोहन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक घडामोडी घडत आहेत. तरीही ते आपल्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या 'कराटे बाबू', 'जेनी', 'ब्रो कोड' यांसारखे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT