Faisal Shaikh spotted with new partner after Jannat Zubair breakup rumors saam tv
मनोरंजन बातम्या

Entertainment News : ब्रेकअपनंतर युट्युबर अडकणार लग्नाच्या बेडीत! मदीनेत पार पडणार निकाह; होणाऱ्या बायकोचा फोटो आला समोर

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी लोकप्रिय जोडी जन्नत जुबैर आणि फैसल शेख यांच्या नात्याला पुर्णविराम लागला असून, नुकताच फैसल त्याच्या आगामी जोडीदारासोबत कॅमेऱ्यात कैद झाला याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Saam Tv

प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडिया स्टार फैसल शेख सध्या त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री जन्नत जुबैरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर आता फैसल शेखच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. नुकताच तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत स्पॉट झाला आहे. याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला.

वेडिंग कार्डमधून झाला खुलासा

सोशल मिडिया इन्फ्लूएनसर युविका चौधरीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये एक सजवलेले वेडिंग कार्ड पाहायला मिळाले, ज्यावर 'MR. FAISU & TANYA' असे लिहिले होते. या कार्डनुसार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी मदीना शरीफ (सौदी अरेबिया) येथे फैजू आणि तान्याचं लग्न होणार असून 19 ऑक्टोबरला मुंबईत रिसेप्शन पार पडणार आहे समजले मात्र अजूनही फैजूने या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहि.

तसेच, कार्डवर नमूद केल्याप्रमाणे मोहम्मद मुदस्सीर आणि निक्हत फातिमा अशी नावेही पाहायला मिळाली. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, फैजूच्या होणाऱ्या पत्नीचे खरे नाव निक्हत फातिमा असावे आणि 'तान्या' हे तिचे टोपणनाव असावे. तसेच,फैजूने स्वतः आपल्या व्लॉगच्या माध्यमातून तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती.

होणाऱ्या पत्नीची पहिली झलक आली समोर

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फैजू त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची होणारी पत्नी पांढऱ्या रंगाच्या बुर्ख्यात पाहायला मिळत आहे, तर तिच्या पुढे पांढरा शर्ट घालून फैजू उभा असल्याचे दिसतो. फैजूने पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या एखाद्या मुलीसोबत अशा प्रकारे हजेरी लावली आहे. आपल्या होणाऱ्या जोडीदाराला पाहताच फैजूच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल पाहायला मिळाली. या झलकेने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

जन्नत जुबैरसोबतच्या नात्यावर पूर्णविराम

एक काळ असा होता जेव्हा जन्नत जुबैर आणि फैजू एकमेकांचे घट्ट मित्र मानले जात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. जरी फैजू किंवा जन्नत दोघांपैकी कोणीही कधीही त्यांच्या नात्याची किंवा ब्रेकअपची अधिकृत घोषणा केली नसली, तरी फैजूच्या लग्नाच्या बातम्यांवरून असे दिसून येते की तो आता आपल्या आयुष्यात पुढे निघून गेला आहे. आता सर्वांना त्याच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper Benefits For Irregular Periods : दर महिन्याला मासिक पाळी येत नसेल तर काळ्या मिरीचा सोपा उपाय करून पाहा, आराम मिळेल

Maharashtra News Live Update: ममता बॅनर्जी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

देवीचं दर्शन घेऊन परतताना भाविकांचा भीषण अपघात; १५ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रकच्या धडकेने उलटला, परिसरात हळहळ

Property Papers : घराची ओरिजनल कागदपत्र बँकेकडे? कायदेशीर मालकी हक्क कसा सिद्ध कराल?

SCROLL FOR NEXT