Mahadev Betting Case Saam TV
मनोरंजन बातम्या

Explainer: 'महादेव'च्या नावाने सट्टेबाजी, दुबईत लग्नाला उडवले २०० कोटी; कोण आहे सौरभ चंद्राकर?

Mahadev Betting Case: बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी अडकलेले 'महादेव बुक' हे ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप आहे तरी काय घ्या जाणून....

Priya More

Mahadev Book Gambling App:

ऑनलाइन बेटिंगसाठी प्रसिद्ध असलेले 'महादेव बुक' (Mahadev Book) हे ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप सध्या चर्चेत आहे. या अ‍ॅपद्वारे होणाऱ्या मनी लाँड्रिंग याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली होती. ईडीने या अ‍ॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) नेटवर्कवर छापे टाकले होते.

या कारवाईत ईडीने जवळपास ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीने भोपाळ, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी ही कारवाई केली होती. आता या प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सेलिब्रिटी अडकले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत...

लग्नासाठी २०० कोटींचा खर्च -

'महादेव बुक'चे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. हे दोघेही युएईमधील दुबई येथून बेटिंग अ‍ॅप चालवतात. यामधील सौरभ चंद्राकर याने यावर्षीच फेब्रुवारीमध्ये दुबईत शाही विवाह केला होता. या लग्नासाठी त्याने तब्बल २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केली होती. त्याने लग्नासाठी १२० कोटी रुपये देऊन वेडिंग प्लॅनर देखील ठरवला होता. या लग्नाला सौरभने जो खर्च केला होता तो खर्च आपल्या देशातील अंबानी, मित्तल यासारखे उद्योजकांच्या तोडीचा होता.

नातेवाईकांना लग्नाला आणण्यासाठी प्रायव्हेट जेटची व्यवस्था -

सौरभ चंद्राकरने फेब्रुवारीमध्ये दुबईमध्ये लग्न केले. सौरभने लग्नासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च केला होता. लग्नासाठीचा हा खर्च पाहून अनेकांनी भूवया उंचावल्या होत्या. सौरभने भारतामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना लग्नासाठी दुबईला घेऊन जाण्यासाठी भाड्याने प्रायव्हेट जेट बुक केले होते. सौरभचे नातेवाईक प्रायव्हेट जेटने नागपूरवरून दुबईला आले होते. या शाही लग्नासाठी सौरभने वेडिंग प्लॅनर, डान्सर, डेकोरेटर इत्यादींना मुंबईतून भाड्याने घेण्यात आले होते. या सर्वांना त्याने रोख रक्कम दिली होती.

छत्तीसगडचा तरुण -

केंद्रीय एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दुबईतून रॅकेट चालवणाऱ्या सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोन किंगपिनने बेटिंग अ‍ॅपमधून ५००० कोटी रुपये कमावले आहेत. ऑनलाइन सट्टा चालवून कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा सौरभ चंद्राकर हा छत्तीसगडची औद्योगिक नगरी भिलाई येथील आहे. सौरभ चंद्राकर हा रवी उप्पल नावाच्या अन्य एका साथीदारासह हा ऑनलाइन सट्टा अ‍ॅप चालवत होता. या तरुणांनी महादेवच्या नावाने हा सट्टेबाजीचा व्यवसाय सुरू केला होता. या अ‍ॅपचा टर्नओव्हर जवळपास २०००० कोटी रुपये इतका आहे.

काय आहे महादेव अ‍ॅप?

महादेव अ‍ॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्य पोलिसांनी त्या अ‍ॅपवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ चंद्राकर हा रवी उप्पल हे दुबईतून हे बेटिंग अ‍ॅप चालवतात. या अ‍ॅपचे नेटवर्क फक्त भारतच नाही तर नेपाल आणि बांगलादेशसह अन्य देशामध्ये देखील पसरले आहे.

महादेव ज्यूस सेंटर ते महादेव अ‍ॅप -

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सौरभ चंद्राकरचे छत्तीसगडमधील भिलाई येथे महादेव ज्यूस सेंटर नावाने एक छोटेसे ज्यूसचे दुकान होते. त्यावेळी तो ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवर सट्टा लावायचा. यामध्ये त्याचे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. सौरभ चंद्राकरचा मित्र रवी उप्पल यानेही सट्टेबाजीत सुमारे १० लाख रुपये गमावले होते. बेटिंग सिंडिकेटने पैसे वसुलीसाठी दबाव टाकल्यानंतर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे भिलाईहून दुबईला पळून गेले.

दोघांनीही दुबईत छोटी-मोठी नोकरी केली. मग कसेतरी पैसे जमवून 'महादेव बुक अ‍ॅप' नावाचे बेटिंग अ‍ॅप सुरू केले. महादेव ऑनलाइन बुक लाँच झाल्यापासून सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. सध्या भारतामध्ये या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली असली तरी इतर देशांमध्ये हे अ‍ॅप सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT