Entertainment On OTT  
मनोरंजन बातम्या

OTT वर मनोरंजनाचा धमाका; या आठवड्यात दिसणार प्रभास आणि धनुषचा जलवा

Bharat Jadhav

OTT च्या जगाचे नियम चित्रपटगृहांपेक्षा बरेच वेगळे आहेत, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित केले जातात आणि वीकेंडला खास बनवतात. तर OTT वरील चित्रपट कधीही प्रदर्शित होतात. तर ओटीटीचा आनंद आपल्याला मोबाईलदेखील घेता येतो. त्यामुळे प्रेक्षक मेट्रो आणि ट्रेनमध्ये प्रवास करताना मिळालेल्या फावल्या वेळेत हे मनोरंजनाचा आनंद लुटत असतात.

OTT वर मोठं मोठ्या बॅनरचे चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहे. या आठवड्यात अनेक मनोरंजक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. 'कल्की 2898 AD' पासून 'रायन' पर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

एंग्री यंग मेन

OTT- प्राइम व्हिडिओ

रिलीजची तारीख- 20 ऑगस्ट

सलीम खान आणि जावेद अख्तर या हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या नावांचे आयुष्य ओटीटी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या जीवनावर चित्रित केलेल्या माहितीपट या वेबसीरिज प्रदर्शित केला जाणार आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन तीन भागांमध्ये तयार करण्यात आलाय. दोघांचे एकत्र येणे, चित्रपटांच्या कथा लिहिणे आणि यशाची शिखरे एकत्र गाठणे यात दाखवण्यात आले आहे.

GRRR

OTT- डिस्ने प्लस हॉटस्टार

तारीख- 20 ऑगस्ट

'गर्र' या मल्याळम चित्रपटाची कथा सत्य घटनांपासून प्रेरित आहे. बेकायदेशीरपणे जंगलात घुसल्यावर लोकांचे काय हाल होतात याची कथा चित्रपटात दाखवण्यात आलीय.

कल्कि 2898 एडी

ओटीटी- नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ

रिलीज तारीख- 22 ऑगस्ट

चित्रपटगृहानंतर 'कल्की 2898 एडी' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी स्टारर असलेल्या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. प्रेक्षक या चित्रपटाची OTT वर येण्याची वाट पाहत आहेत.

फॉलो कर लो यार

OTT- प्राइम व्हिडिओ

रिलीज तारीख- 22 ऑगस्ट

आपल्या विचित्र कपड्यांसह सोशल मीडियावर खळबळ माजवणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद देखील ओटीटी रिलीजद्वारे तिच्या आयुष्याशी संबंधित खुलासे करणार आहे. ती 'फॉलो कर लो यार'मध्ये दिसणार आहे.

रायन

OTT- प्राइम व्हिडिओ

रिलीज डेट- 23 ऑगस्ट

तमिळ चित्रपट 'रायन' हा एक ॲक्शन चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन धनुषने केले आहे. या चित्रपटात केवळ दिग्दर्शकच नाही तर मुख्य भूमिकेत देखील आहे. 26 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तिकड़म

रिलीज डेट- 23 ऑगस्ट

प्लॅटफॉर्म- जिओ सिनेमा

अमित सियालचा 'तिकड़म' हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. हे एका माणसाची कथा सांगते. यात हा व्यक्ती आपले छोटे शहर सोडून मोठ्या शहरात येतो. या चित्रपटात अरिष्टा जैन, आरोही सौद, दिव्यांश द्विवेदी आणि नयन भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन विवेक अंचलिया यांनी केले आहे.

इनकमिंग

ओटीटी- नेटफ्लिक्स

रिलीज तारीख- 23अगस्त

'इनकमिंग' हा हॉलिवूडचा कॉमेडी चित्रपट आहे. हे चार तरुण मित्रांची कथा सांगते. जे त्यांचे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT