Marathi actresses divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actresses Divorce: थाटामाटात माडंला संसार अन् अर्ध्यावरती डाव मोडला..अशी आहे 'या' मराठी अभिनेत्रींच्या घटस्फोटाची स्टोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Serial Actress Updates: अभिनय क्षेत्र... अर्थाच ते बॉलिवूड इंडस्ट्री असो वा मराठी इंडस्ट्री. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा संपूर्ण आयुष्य आपल्याला निराळे असल्याचे पाहायला मिळते. एवढेच नाही तर अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचं आयु्ष्य सर्वसामान्यांना खुणावते.कारण या क्षेत्रातील प्रत्येक कलाकारांची संपूर्ण लाइफस्टाइल संपूर्ण निराळे असते. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला लांबून कलाकारांचे आयुष्य हे ग्लॅमरस वाटते. मात्र, त्यांचेही खासगी आयुष्य अभिनय क्षेत्रात दाखवले जाणारं असे ग्लॅमरस नसते किंवा अलबेल नसते.

मराठी चित्रपट(Movie) सृष्टी असेल किंवा बॉलिवूडमधील कलाकांरांचे लग्न आणि घटस्फोट कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात.आपण अनेकदा पाहिले असेल कलाकारांचे लग्न झाल्यानंतर ते फार काळ टिकत नाही. यात काही कलाकार घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकतात तर, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी घटस्फोट झाल्यानंतर अजूनही लग्न केलेले नाहीत.मात्र हे कलाकार सध्या मराठी (Marathi)इंडस्ट्रीमध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत.चला तर आज आपण मराठी इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्रींबद्दल जाऊन घेऊयात,ज्यांनी घटस्फोट झाल्यानंतरही अजून पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही.

सई ताम्हणकर

Sai Tamhankar

दमदार अशा अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे.सई फक्त मराठी फिल्म इंडस्ट्रीतील नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सई अनेक मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. सईने २०१३ मध्ये अमेय गोसावी याच्याशी लग्न केले होते. परंतू या दोघांचा काही वर्षात दोघांनी घटस्फोट घेतला.सध्या सई ताम्हणकर आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये दिसून येते.

रुपाली भोसले

Rupali Bhosale

आई कुठे काय करते या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहचली.एवढेच नाही तर अनेक मालिकांमध्ये (series)अभिनेत्री रुपाली भोसले काम केले आहे.मात्र या अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा होत असते. एका मिडिया रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये रुपाली मिलिंद शिंदेशी लग्न बंधनात अडकली होती.मात्र लग्नाच्या काही महिन्यात त्यांच्या दोघांत अनेक मतभेद सुरु झाले. या कारणांवरुन रुपाली भोसले आणि मिलिंद शिंदे यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर रुपाली शिंदे अजूनही सिंगल आहे आणि रुपाली सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तेजश्री प्रधान

Tejashree Pradhan

होणार सुन मी ह्या घरची आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. तेजश्रीने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रत्येक एका प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेले आहे. मात्र होणार सून मी ह्या घरची मालकेनंतर तेजश्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा होऊ लागली,ती म्हणजे शंशाक केतकर आणि तिच्या लग्नाबद्दल.मीडिया रिपोर्टनुसार,तेजश्री प्रधान आणि शंशाक केतकर यांनी २०१४ मध्ये लग्न(Wedding) केले होते परंतू एका वर्षात दोघांनी घटस्फोट घेतला.यात सध्या शंशाक पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकला तर तेजश्री मात्र अजूनही सिंगल आहे. तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे.

अपूर्वा नेमळेकर

Apurva Nemlekar

अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने शेवंता हे पात्र साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.त्यानंतर अपूर्वा नेमळेकर आपल्याला मराठी बिग बॉस ४(Big Boss) या पर्वात दिसून आली होती.मात्र अपूर्वा नेमळेकर ही शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहचली.मात्र तुम्हाला या अभिनेत्रीच्या खाजगी आयु्ष्याबद्दल माहिती आहे का?अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचाही घटस्फोट झालेला आहे.अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर रोहन देशपांडेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे यांचेही लग्न फार काळ टिकू शकलेले नाही. घटस्फोट झाल्यानंतर अजूनही अपूर्वा नेमळेकर सिंगल आहे आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांची भेटीस येत असते.

तेजस्विनी पंडित

Tejaswini Pandit

तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सौंदर्याची भूरळ घालत असते. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने(Tejaswini Pandit) मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वता:चे एक वेगळे स्थान निर्माण केले असून प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार,तेजस्विनी पंडितने तिचा बालपणीचा मित्र असलेला भूषण बोपचेसोबत २०१२ मध्ये विवाह बंधनात अडकली होती.मात्र यांचे ही लग्न जास्क काळ टिकू शकलेले नाही. लग्न झाल्यानंतर काही वर्षात दोघांचा घटस्फोट झाला.सध्या तेजस्विनी पंडित सिंगल असून मराठी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT