Aai Kuthe Kay Karte SaamTv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती-आशुतोषच्या नात्यात दुरावा?; वीणाचं सत्य लपवल्याने अरुंधतीला आशुतोषनं सुनावलं, म्हणाला....

Aai Kuthe Kay Karte Latest Promo: नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मालिकेच्या प्रोमोत सुरूवातीला, मालिकेतील कलाकार हे एकत्र दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aai Kuthe Kay Karte Latest Promo: 'आई कुठे काय करते' (AaI Kute Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने फार कमी वेळात लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. घराघरात रोज ही मालिका पाहिली जाते. नुकतंच वीणाच्या सत्याने केळकर कुटुंब हादरले आहे. त्यामुळे मात्र अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात दुरावा आला आहे.

नुकताच मालिकेचा प्रोमो (Serial Promo) प्रदर्शित झाला आहे. मालिकेच्या प्रोमोत सुरूवातीला, मालिकेतील कलाकार हे एकत्र दिसत आहेत. यावेळी, आशुतोष अरुंधतीकडे रागाने बघतो आणि म्हणतो, "वीणाने तुला सांगितले म्हणून तू आमच्यापासून या सर्व गोष्टी लपवल्यास. खूप चुकीचं वागलीस तू." यानंतर सुलेखा ताई हीआशुतोषची साथ देत म्हणते, "आशुतोष तू बरोबर म्हणालास. ही काय किरकोळ गोष्ट नाही."

यावर आशुतोष म्हणतो,'मी पोलिसांत तक्रार करणार आहे.' त्यावर अरुंधती म्हणते, 'मी पण येते तुमच्यासोबत.' त्यावर आशुतोष अरुंधतीला साफ नकार देतो. अरुंधती भावूक होऊन आशुतोषला म्हणते,'आशुतोष... आशुतोष प्लीज, मला खरंच तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं.' त्यावर आशुतोष म्हणतो, 'निदान इथून पुढे तरी माझ्यापासून प्लीज काहीच लपवू नका.प्लीज!'(Entertainment marathi news)

मालिकेच्या मागील काही भागात वीणाच्या भूतकाळबद्दल उलगडा होताना दिसत आहे. वीणाच्या अस्वस्थतेचं आणि घाबरण्याचं कारण आता समोर आलं आहे. वीणा नवरा अमनबद्दलचं सत्य अरुंधतीला सांगते. पण ही गोष्ट वीणाच्या सांगण्यामुळे अरुंधती आशुतोषपासून लपून ठेवले होते. पण यामुळे आता त्यांच्यात दुरावा आला आहे. त्यात भर म्हणजे अनिरुद्धलाही वीणाचं सत्य समजलं आहे. आता वीणाच्या या सत्याचा तो कसा वापर करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मालिका ही फारच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आशुतोष आणि अरुंधती यांच्यातील प्रेम प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण आता त्यांच्यातील दुरावा कोणतं रुप घेतं?हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेत आता वीणाच्या नवऱ्याची एन्ट्री होणार का? अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहे.आता आशुतोष-अरुंधतीचं नातं कोणतं नवीन वळण घेत हेही पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. त्यात अनिरुद्ध कोणती नवी खेळी खेळणार हे लवकरच येत्या भागात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: धुळ्याच्या लेकीचा स्वॅगच भारी, कोण आहे ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून झोप उडेल

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT