Khatron Ke Khiladi 13  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khatron Ke Khiladi 13 : ‘या’ तारखेपासून सुरू होणार ‘खतरों के खिलाडी 13', अंगाचा थरकाप उडणाऱ्या टास्कला सामोरे जाणार स्पर्धक

खतरों के खिलाडी’ निर्माता रोहित शेट्टीचा टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे.या शोबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khatron Ke Khiladi 13 Update: ‘खतरों के खिलाडी’ निर्माता रोहित शेट्टीचा(Rohit Shetty) टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या प्रसिद्ध शोच्या १३ व्या सीझनबद्दलची चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. रोहित शेट्टी च्या रिअॅलिटी शोबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. लवकरच येत्या काही दिवसात हा शो सुरू होणार आहे. नुकतंच, निर्मात्यांनी अनोख्या पद्धतीने शोची तारीख जाहीर केली आहे.

निर्माता रोहित शेट्टी होस्ट करत असलेला ‘खतरों के खिलाडी १३’ हा शो येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होणार आहे. या सीझनमध्ये स्पर्धक केवळ रियल गोष्टींचा सामना करताना दिसणार नाहीत तर खऱ्या धोक्यांचा ही सामना करताना दिसणार आहेत. नुकताच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून प्रोमो देखील प्रदर्शित केला आहे.(Entertainment Marathi News)

निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, स्पर्धक एकापेक्षा एक स्टंट करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस १६’ मधील अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यातील वादाची एक झलक देखील दाखवली आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गौतम हे ‘बिग बॉस १६’मध्ये एकत्र दिसले होते. आता ते दोघे ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये देखील एकत्र दिसणार आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये अर्चना आणि शिव यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘खतरों के खिलाडी १३’ च्या शूटिंगदरम्यान जखमी झालेल्या स्पर्धकांमध्ये रोहित रॉय, अर्चना गौतम, अंजुम फकीह, अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांची नावे आहेत. रोहित रॉय इतका जखमी झाला होता की तो या शोमधून बाहेर पडल्याची चर्चा होती. मात्र शूटिंगवरून तो पुन्हा भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले. तर अर्चना गौतमच्या हनुवटीला तीन टाके पडले आहेत.

या सर्व अडचणी असूनही स्पर्धक ट्रॉफी मिळविण्यासाठी सर्वच स्पर्धकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर काही स्पर्धकांना ‘खतरों के खिलाडी १३’ मधून बाहेर काढण्यात आले आहे, पण ते कोणते स्पर्धक आहे, याचं उत्तर शो सुरू झाल्यावर मिळेल. या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केप्टाऊन शहरात सुरू आहे. ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, अंजुम फकीह, ऐश्वर्या शर्मा, अरिजित तनेजा, रोहित रॉय, अंजली आनंद, रुही चतुर्वेदी, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी या स्पर्धकांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

SCROLL FOR NEXT