Emraan Hashmi Awarapan 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इमरान हाश्मीच्या वाढदिवशी 'आवारापन २' ची घोषणा; टीझर प्रदर्शित करत चाहत्यांना दिलं सरप्राईज

Emraan Hashmi : इमरान हाश्मीने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'आवारापन' चित्रपटाच्या सिक्वेलची एक टीझर शेअर करत अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेमुळे चाहते त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Shruti Vilas Kadam

Emraan Hashmi Awarapan 2: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका खास घोषणा केली - इमरान हाश्मीने 'आवारापन' या चित्रपटाचा सिक्वेल जाहीर केला. इमरान लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी 'आवारापन २' घेऊन परत येत आहे! वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आता अटकळांना पूर्णविराम मिळाले आहे. अभिनेत्याने २००७ च्या 'आवारापन' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे.

सोमवारी, इमरानने 'आवारापन' चित्रपटाचा टीझर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याचे पात्र एका बोटीवर उभे राहून सूर्यास्ताच्या प्रकाशात असलेल्या आकाशकडे पाहत आहे. त्याचवेळी तो एका पक्ष्याला पिंजऱ्यातून मुक्त करतो आणि म्हणतो, "दुसऱ्याच्या आयुष्यासाठी मरणे हे माझे भाग्य आहे. या टीझरचा शेवट "आवारापन २ - प्रवास सुरूच आहे" या मजकुरासह होतो आणि बॅकग्राऊंडला 'तेरा मेरा रिश्ता' हे गाणे वाजत राहते.

२०२६ साली चित्रपट प्रदर्शित

इमरान हाश्मीने पुष्टी केली की 'आवारापन २' हा त्याचा आगामी चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझर शेअर करताना त्याने लिहिले, “बस मुझे कुछ और देर जिंदा राख… #आवारापन२ सिनेमागृहात, ३ एप्रिल २०२६.”

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

इमरान हाश्मीने पोस्ट शेअर करताच कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. एका नेटकाऱ्यांने कमेंट केले, “सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, लॉर्ड इमरान.” दुसरी कमेंट केली, “शेवटी, हा चित्रपट येत आहेच” तिसऱ्या कमेंटमध्ये लिहिले होते, क्या बात है सर शेवटी 'आवारापन २' कन्फॉर्म झालाच. तर, अनेक नेटकऱ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT