ED summons actress Shraddha Kapoor Kapil Sharma huma qureshi on mahadev betting app case Saam TV
मनोरंजन बातम्या

Betting App case: अभिनेत्री श्रद्धा कपूरला ईडीकडून समन्स, कपिल शर्माचीही चौकशी होणार; काय आहे प्रकरण?

ED summons to Bollywood actors: श्रद्धा कपूर पाठोपाठ अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार ईडीच्या रडारवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून १५ सेलिब्रिटींना समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे.

Satish Daud

ED summons to Bollywood actors

ऑनलाईन सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येऊ लागली आहे. त्यामुळे ईडीने आता या कलाकारांना आपल्या रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे ईडीने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावल्याची चर्चा सुरू असताना, आता दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूरला देखील समन्स बजावल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

श्रद्धा कपूर पाठोपाठ अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार ईडीच्या रडारवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून १५ सेलिब्रिटींना समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच या कलाकारांना चौकशीला देखील बोलावलं जाणार आहे. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरने चौकशीला हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, ईडीने (ED summons) लोकप्रिय विनोदी अभिनेता कपिल शर्मा याला देखील समन्स बजावलं आहे. तर टीव्ही अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनाही चौकशीला बोलावलं आहे. या तिन्ही कलाकारांची एकाच दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र, ही चौकशी कधी होणार याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

मेसर्स महादेव अ‍ॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या अॅपचं कामकाज संयुक्त अरब अमिरातीतील मध्यवर्ती मुख्यालयातून होत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती.

त्यानुसार ईडीने छापेमारी करत अ‍ॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर छापे टाकले होते. या कारवाईत ईडीने जवळपास ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीने भोपाळ, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी ही कारवाई केली होती.

दरम्यान, या बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकार याचं दुंबईत लग्न झालं होतं. या लग्नावर जवळपास २०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. सौरभच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही, तर सौरभ याच्या लग्नात नृत्य सादरीकरणासाठी कथितपणे पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT