Durandhar 2 Saam tv
मनोरंजन बातम्या

Durandhar 2: कोण आहे दाऊद? 'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब'ची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

Durandhar 2: धुरंधर २ मध्ये 'बडे साहेब' ही भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे? दानिश इक्बालने ही भूमिका कशी मिळाली याबद्दल मुलाखतीत सविस्तर माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Durandhar 2: धुरंधर: द रिव्हेंज (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये, 'बडे साहेब'या पात्राबद्दल सर्वाधिक उत्सुकता होती. अखेर हे उघड झाले आहे की, दानिश इक्बाल हा अभिनेता ही भूमिका साकारत आहे. दानिशने सांगितले की, सुरुवातीला खुद्द त्यालाही आपण ही भूमिका यशस्वीपणे साकारू शकू, याची खात्री वाटत नव्हती. जेव्हा त्याला पहिल्यांदा ही भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा त्याला वाटले की तो दाऊद सारखा नाही; तरीही, आदित्य धरने त्याच्यावर विश्वास ठेवला.

व्हेरिटी इंडिया (Variety India) सोबतच्या मुलाखतीत,दानिशने त्याच्या भूमिकेशी संबंधित अनेक किस्से शेअर केले. त्याने आदित्य धरने दिलेल्या डिटेलचे कौतुक केले. तो म्हणाला, "अभिनेते म्हणून, आम्ही आमच्या कामात आमचे सर्वस्व ओततो; आम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पात कठोर परिश्रम केले. तरीही, काही पात्रे अशी असतात जी पडद्यावर खरोखरच काहीतरी जादुई निर्माण करतात. जर 'बडे साहेब' किंवा दाऊद या पात्राला सध्या पडद्यावर इतकी प्रशंसा मिळत असेल, तर त्याचे श्रेय केवळ अभिनयालाच नव्हे तर दिग्दर्शकाचेही आहे.

'दाऊद कोण आहे?'

या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना दानिशने सांगितले, "जेव्हा मुकेश छाब्राने मला दाऊदची भूमिका साकारायला सांगितले, तेव्हा मी त्याला विचारले, 'दाऊद कोण आहे?'कारण 'दाऊद' हे एक सामान्य नाव देखील आहे. जेव्हा त्याने मला या पात्राचे स्वरूप समजावून सांगितले, तेव्हा मी विचारले, 'तुम्हाला खात्री आहे ना?' मी हे करेण...? तरीही, मुकेश आणि आदित्य या दोघांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. हळूहळू, मला स्वतःवर विश्वास वाटू लागला. या भूमिकेसाठी मी खूप तयारी केली."

'बडे साहेब'चं दाऊद असेल

धुरंधर भाग १ मध्ये 'बडे साहेब' यांचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु खुद्द ते पात्र मात्र कधीच पडद्यावर दाखवण्यात आले नव्हते. हा रोल कदाचित दाऊद इब्राहिमचा असावा, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये जोरात सुरू होती. पण, 'बडे साहेब'चं दाऊद असेल असे वाटतं नाही. धुरंधर २ मध्ये दानिश एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मात्र, त्याचा लूक पाहून प्रेक्षकांना धक्का बसला. कारण दानिशला ओळखणे पूर्णपणे कठीण आहे.

धुरंधरची कमाई

धुरंधर २ च्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी, या चित्रपटाने संपूर्ण भारतातूनच १०२.५५ कोटी रुपयांचा टप्पा गाठला. दुसऱ्या दिवशी धुरंधर २ ने २२० कोटींच्या वर बिझनेस केला. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या काळात चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सासूसह तिघांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन

Makeup Hacks : दिवाळी असो वा भाऊबीज: आय मेकअप अन् लिपस्टिकच्या या ५ ट्रिक्सने मिळवा गॉर्जियस फेस्टिव्ह लुक

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये कंटेनरमधून गोवंशाची तस्करी

Government Holiday : दिवाळी सणानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर; कधी आणि कुठल्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

Ice on Face Benefits: पार्लरला जाण्याची गरज नाही! चेहऱ्यावर बर्फ लावल्याने मिळेल ग्लोइंग स्किन

SCROLL FOR NEXT