Drishyam 3 saam tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 3 : "प्रत्येकाचं सत्य वेगळं, डाव अजून संपलेला नाही"; विजय पुन्हा येतोय, 'दृश्यम 3' ची रिलीज डेट जाहीर

Drishyam 3 Announcement : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 3' ची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच चित्रपटाची धमाकेदार झलक पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 3'ची झलक समोर आली आहे.

'दृश्यम 3' नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'दृश्यम' च्या पहिल्या दोन भागांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच नुकताच चित्रपटाची धमाकेदार झलक पाहायला मिळाली आहे. टीझर पाहून चाहते 'दृश्यम 3'साठी खूपच उत्सुक पाहायला मिळत आहेत. 'दृश्यम 3'मधून पुन्हा एकदा विजय साळगावकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'दृश्यम 3'च्या टीझरमध्ये पहिला दोन भागांची झलक पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनची गोष्ट दिसत आहे. व्हिडीओत विजय साळगावकर म्हणते की, "दुनिया मला अनेक नावांनी ओळखत, पण मला काही फरक पडत नाही. मागच्या सात वर्षात जे काही झाले, मी जे काही केले, जे पाहिले, जे दाखवले यावरून मला एक गोष्ट समजली आहे, जगात प्रत्येकाचे 'सत्य' वेगळे आहे. माझे सत्य फक्त माझे 'कुटुंब' आहे. जोपर्यंत सगळे थकणार नाहीत, जोवर सगळे हार मानणार नाहीत तोपर्यंत मी इथेच उभा आहे. एक रक्षक म्हणून, माझ्या कुटुंबाचा आधार म्हणून...गोष्ट अजून संपलेली नाही...शेवटचा भाग अजून बाकी आहे..."

'दृश्यम' चे पहिले दोन भाग

अजय देवगणच्या 'दृश्यम'चा हा तिसरा भाग आहे. पहिले दोन भाग खूप गाजले. आता तिसरा भाग पुन्हा धुमाकूळ घालायला येत आहे. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.

रिलीज डेट काय?

'दृश्यम 3' च्या ट्रेलरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "आखिरी हिस्सा अभी बाकी है..." अजय देवगणचा 'दृश्यम 3' नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice And Diabetes: भात खाल्ल्यानं खरंच डायबेटिस होतो? २ अक्षरांचं उत्तर अन् मनातली शंका होईल काही मिनिटांत दूर

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT