Drishyam 2
Drishyam 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Drishyam 2' On OTT: 'दृश्यम २' ओटीटीवर रिलीज, चित्रपट पाहण्यासाठी मोजावी लागणार 'इतकी' किंमत

Pooja Dange

Drishyam 2 OTT Release: अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट 'दृश्यम 2' हा बॉलिवूड चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर 42 व्या दिवशीही लोक तितक्याच उत्सुकतेने चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. सस्पेन्सने थ्रिलर 'दृश्यम 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये बघता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'दृश्यम २' ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Movie)

थँक गॉडनंतर आता अजय देवगणचा चित्रपट 'दृश्यम 2' देखील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सध्या तरी OTT प्लॅटफॉर्मवर 'दृश्यम 2' पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या सहा आठवड्यांपासून चित्रपटगृहांमध्ये मिळत असलेले 'दृश्यम 2'चे यश पाहून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या अॅमेझॉन स्टोअरमध्ये तो रिलीज केला आहे. म्हणजेच तुम्हाला अजय देवगणचा हा चित्रपट पाहायचा असेल तर प्राईम सदस्यत्वाव्यतिरिक्त तुम्हाला १९९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, तरच तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video वर पाहू शकाल.

दृष्यम 2 ची मागणी लक्षात घेऊन, सध्या तुम्ही ते १९९ रेंट पेमेंटसह OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदर्शनाच्या 80 दिवसांनंतर, 'दृश्यम 2' 26 जानेवारीच्या आसपास Amazon Prime वर फ्री-स्ट्रीम केला जाईल. (OTT)

दृश्यम 2 मध्ये, विजय साळगावकरच्या बंद झालेल्या केसची कथा पुन्हा उघडली आहे. यावेळी तब्बू नव्हे तर अक्षय खन्ना या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त अक्षय खन्ना, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दृश्यम 2 ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 230 कोटी आणि जगभरात सुमारे 329 कोटींची कमाई केली आहे आणि आता निर्माते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा विचार करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT