Dream Girl 2 Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 Collection: आयुष्मान खुरानाला पहिल्यांदाच मिळालं इतकं मोठं यश: 'Dream Girl 2'ची दमदार ओपनिंग

Dream Girl 2 Box Office Collection: 'DreamGirl 2 ची सुरुवात पहिल्या दिवशी खूप चांगली झाली आहे.

Pooja Dange

Ayushmann Khurrana's Career Best Opening Film:

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल २' काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाची भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी माहीती दिली आहे.

'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. या कॉमेडी चित्रपटाने शुक्रवारी १०.६९ कोटींचे कलेक्शन केले असल्याचे तरण आदर्श यांनी सांगितले आहे.

तरण आदर्श यांचे ट्वीट

तरण आदर्श यांनी ट्वीट करत लिहिले आहे, 'द केरला स्टोरी, जारा हटके जारा बचके, सत्यप्रेम की कथा, रॉकी ओर रानी की प्रेमकहाणी, गदर २, OMG २ आणि आता 'ड्रीम गर्ल २'ची धमाकेदार सुरुवात. बॉलिवूडला पुन्हा जीवनद देण्यास या चित्रपटाची मदत झाली आहे. 'ड्रीम गर्ल २'ची पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे.'

'DreamGirl 2 ची सुरुवात पहिल्या दिवशी खूप चांगली झाली आहे... चित्रपटाच्या बिजन्समध्ये ४नंतर वाढ झाल्याचे दिसले, त्यामुळे एक स्ट्रॉंग वीकेंड चित्रपटाला मिळू शकतो... शुक्र ₹ 10.69 कोटी.'

चंदीगड करे आशिकी, अनिक, डॉक्टर जी, अॅक्शन हिरोसह त्याच्या शेवटच्या चार चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना केल्यानंतर, 'ड्रीम गर्ल २' चांगले कलेक्शन करेल अशी आयुष्मानला अपेक्षा आहे. तर चित्रपट अपेक्शित कामगिरी करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल २ आयुष्मानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ओपनिंग करणार चित्रपट ठरलं आहे. बाला (रु. 10.15 कोटी) आणि ड्रीम गर्ल (10.05 कोटी) नंतर या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली आहे.

'ड्रीम गर्ल २'मध्ये आयुष्मान करमवीर उर्फ ​​करम हे पात्र साकारत आहे. तर करम चित्रपटामध्ये पूजा झाला आहे. अनन्या त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका बजावते. आयुष्मान पहिल्यांदाच अनन्यासोबत काम करत आहे. चित्रपटात मनजोत सिंग, राजपाल यादव, परेश रावल, असरानी, ​​मनोज जोशी, सीमा पाहवा आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

SCROLL FOR NEXT