100th Marathi Sahitya Sammelan Saam Tv
मनोरंजन बातम्या

१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात होणार शतकमहोत्सवी संमेलन

100th Marathi Sahitya Sammelan: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्यविश्वात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shruti Vilas Kadam

100th Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्यविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि विचारवंत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी वर्षात त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'अक्करमाशी' हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र देशभरात प्रसिद्ध आहे.

पुण्यात होणाऱ्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची नावे चर्चेत होती. यामध्ये  डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड आदि साहित्यिकांची नाव चर्चेत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. डॉ. लिंबाळे यांच्या नावाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा पाठिंबा दिल्यामुळे त्यांची शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यत आली.

कोण आहेत डॉ. शरणकुमार लिंबाळे?

डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर येथे त्यांचा जन्म झाला. दलित साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक विषमता, जातिव्यवस्था, संघर्ष, अन्याय आणि मानवी मूल्यांचे प्रभावी चित्रण पाहायला मिळते. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, उपेक्षितांचे जगणे आणि संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण समोर आले. या आत्मकथेमुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली. त्यांच्या लेखनाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील साहित्यविश्वात मोलाचे स्थान आहे. डॉ. लिंबाळे यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर ‘सनातन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘दलित ब्राह्मण’ यांसारखी ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र', 'दलित साहित्य आणि सौंदर्य' यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी दलित साहित्याचा वैचारिक आणि समीक्षात्मक दृष्टिकोन मांडला आहे.त्यांनी मराठी विषयातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक तसेच संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

पुण्यात रंगणार शतकमहोत्सवी साहित्य संमेलन

दरम्यान, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. या संमेलनात देशभरातील साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत आणि साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन विशेष आकर्षणाचे ठरणार आहे.

मी खूप भारावून गेलो

समतेच्या लढाईचा हा सत्कार आहे. मी खूप भारावून गेलो आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. महामंडळाचा मराठी लेखकांचा आभारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे. इथल्या पुरोगामी समाजाला आमचं कौतुक केलं. मराठी समाजाचा मराठी वाचक वर्गाचा मी आभारी आहे.जातीयता वाढती आहे. या वातावरणात एक लेखक म्हणून सामाजिक न्यायाची भूमिका मला घ्यावी लागेल. बंदूक घेऊन सामाजिक परिवर्तन करता येत नाही. त्यासाठी पुस्तक आवश्यक आहेत.मी अध्यक्ष म्हणून मला जे जे करता येईल जे नवीन लेखक आहेत. नवीन लेखकाला उत्तेजन देणे हे माझं काम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेची पार्श्वभूमी सांगत प्रताप सरनाईक यांची भूमिका

Salt Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये मीठ कोणत्या दिशेला ठेवलंय? वास्तूशास्त्रात सांगितलीये योग्य दिशा

Pashudhan Yojana: शेळीपालन, दुग्धव्यवसायासाठी सरकारी अनुदान! पशुधन योजनेचा अर्ज 26 नोव्हेंबरपासून सुरू; आधीच तयार ठेवा ही 8 कागदपत्रे

Railway Safety : रेल्वे स्टेशनवर पिवळ्या उंचवट्याच्या फरशा का लावतात? कारण जाणून थक्क व्हाल

Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

SCROLL FOR NEXT