Dr. Babasaheb Ambedkar's Movie
Dr. Babasaheb Ambedkar's Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Birth Anniversary Of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे ५ चित्रपट बघाच

Pooja Dange

Dr. Babasaheb Ambedkar's Movie: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचा जन्म दिवस 'समता दिन' म्हणूनही साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन उलघडणारे अनेक चित्रपट अनेक भाषांमध्ये बनवण्यात आले आहेत. तामिळ, मराठी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असंख्य चित्रपट बनले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023 च्या निमित्ताने त्यांच्यावर बनलेल्या काही चित्रपटांवर एक नजर टाकूया.

भीम गर्जना (1990)

विजय पवार यांचा भीम गर्जना हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मराठीत बनलेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अभिनेता कृष्णानंदने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती, तर प्रथमा देवी यांनी त्यांच्या पत्नी रमाबाई यांची भूमिका साकारली होती. भारतीय संविधान तयार करताना भारताच्या भविष्याबद्दलचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर चित्रपट आधारित आहे.

बालक आंबेडकर (1991)

हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित आहे. बसवराज केस्तुर दिग्दर्शित हा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. तरुण भीमराव आंबेडकर यांची भूमिका चिरंजीवी विनय यांनी साकारली होती, तीर्थप्रसाद, जगन्नाथ राव आणि मास्टर उमेश यांनीही या चित्रपटामध्ये काम केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (2000)

जब्बार पटेल यांच्या या चित्रपटात अभिनेते ममूटी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोलंबिया विद्यापीठातील महाविद्यालयीन दिवस, त्यांचा प्रवास आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची वाटचाल यांचा मागोवा घेण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि क्षण कव्हर करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. यामुळे ममूटीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. बीआर आंबेडकर (2005)

शरण कुमार कब्बर यांचा हा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली आहे. अभिनेत्री तारा यांनी रमाबाई यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ आणि त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला कन्नड राज्य चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

बाळ भीमराव (2018)

या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे विज आणि प्रेमा किरण यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरुवातीच्या जीवनावर, त्यांच्या विचारसरणीवर आणि तत्त्वज्ञानावर आधारित आहे. चित्रपटातील गाणी सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी गायली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये आज PM नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

Maharashtra Monsoon Update: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार

Special Report : Kal Maharashtra | कल महाराष्ट्राचा दिंडोरीचा खासदार कोण होणार...

Ghatkopar Hoarding News | घाटकोपर दुर्घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ

Latur Water Crisis: लातुरात पाणीप्रश्न गंभीर! पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांचा अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT