DD Anchor Gitanjali Aiyar Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

DD Anchor Gitanjali Aiyar Passes Away: प्रसिद्ध अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली...

Doordarshan News Anchor Passes Away: प्रसिद्ध न्यूज टिव्ही अँकर गीतांजली अय्यर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

Chetan Bodke

Gitanjali Aiyar Death: प्रसिद्ध न्यूज टिव्ही अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी ७ जून रोजी निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. अय्यर यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अय्यर यांना श्रद्धांजली वाहत अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

१९७१ मध्ये गीतांजली यांनी वृत्तनिवेदिका म्हणून दुरदर्शनमध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. सलग तीन दशके आपल्या उत्तम कौशल्यांनी वृत्तनिवेदनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. गीतांजली यांना आपल्या कामाप्रती चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला आहे.

क्रीडा मंत्र्यांनी ट्विट करून सांगितले की, “दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील पहिल्या आणि सर्वोत्तम इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. एक मार्गदर्शक आणि अग्रणी असलेल्या गीतांजलींनी पत्रकारिता आणि टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी छाप सोडली. प्रत्येक बातमीत विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि एक वेगळेपणा त्यांनी निर्माण केला. या दु:खद समयी त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांना दु:ख पेलण्याची शक्ती देवो, ही मी प्रार्थना करतो.”

गीतांजली अय्यर यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केले. त्या देशातील पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक होत्या. अय्यर यांनी १९७१ मध्ये दूरदर्शनमध्ये काम करण्यासाठी सुरूवात केली. १९८९ मध्ये गीतांजली यांना उत्कृष्ट महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कारही मिळाला. श्रीधर क्षीरसागर यांच्या 'खानदान' या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

Sanjay Gaikwad: राऊत यांच्या मायचा #@XXX..., संजय गायकवाड यांची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT