Cinema Hall Saam Tv
मनोरंजन बातम्या

New Movies: वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी; ओटीटी प्रेमींसाठी खास दिवाळी गिफ्ट

काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. दिवाळीतील आधीच्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचे भरपेट मनोरंजन होणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना एक दोन नाही तर दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नुकताच काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. दिवाळीतील आधीच्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचे भरपेट मनोरंजन होणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना एक दोन नाही तर दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आपण आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट, जॉनरचा चित्रपट पाहू शकणार आहेत. चला तर एक नजर टाकूया कोणकोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Doctor G

अनेक दिवसांपासून आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग प्रतिक्षा करत होते. सोबतच रकुल प्रित सिंह ही दिसणार आहे. नेहमीप्रमाणे त्याचे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार नक्की.

Code Name Tiranga

चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंदी मिळाली होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मुख्य भूमिकेत परिणीती चोप्रा असून परिणीतीने चित्रपटात पहिल्यांदाच एका गुप्तहेराच्या भूमिकेत असून ती दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.

Kantara

या तेलगू चित्रपटाची खूपच चर्चा रंगत आहे. ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची चर्चा सर्वाधिक असते. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून त्यात पारंपारिक श्रद्धेलाही स्थान देण्यात आले आहे.

Aye Zindagi

सत्य घटनेवर प्रेरित असलेला चित्रपटात लिव्हर सिरोसिस ग्रस्त व्यक्ती लिव्हर डोनरला भेटल्यावर जगायला शिकवते. आयुष्यात काही वेळेनंतर खूप चढ-उतार येतात. या चित्रपटात अभिनेत्री रेवतीही मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Modi Ji ki Beti

निखळ मनोरंजन करणारा चित्रपट पाहायचे असेल तर हा चित्रपट नक्की पहा. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. मोदींची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या एका मुलीचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि नंतर पाकव्याप्त काश्मिरमध्ये नेले.

Kahani Rubber Band Ki

चित्रपटात आकाश आणि काव्या हे दोन मुख्य पात्र दिसतात. चित्रपटात काव्याही गरोदर राहते. त्यानंतर तिचा पती कंडोम बनवणाऱ्या एका कंपनी विरोधात केस दाखल करत चित्रपटाची कहाणी एका रंजक वळणावर जाऊन पोहोचते.

Mid Day Meal

चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर शौरी असून तो एका शेफची भूमिका साकारत आहे. त्या शेफला आपल्या गावातील नागरिकांसाठी काहीतरी करायचे असते, पण आपल्या हालाकिच्या परिस्थितीने तो मजबूर आहे.

Love You Lokatantra

जर तुम्हालाही राजकारणावर विनोद करायला आवडत असेल तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल. ईशा कोपीकर बऱ्याच दिवसांनी या चित्रपटात दिसणार आहे.

Jaggu Ki Lalten

हा चित्रपट एका वेगळ्या कथेवर आधारित असून चित्रपट कॉमेडीवर आधारित आहे.

Kartoot

मदालसा शर्मा आणि पियुष रानडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची कथा एका गरीब कुटुंबातील मुलीवर आधारित आहे. जिचे लग्न एका श्रीमंत मुलाशी होते आणि लग्नानंतर तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

SCROLL FOR NEXT