मनोरंजन बातम्या

Divya Dutta: 'माझ्यासोबत गैरवर्तन केलं', सकाळी सकाळीच अभिनेत्रीने अवळला राग, व्हिडिओ पोस्ट करत दिव्या दत्ताने व्यक्त संताप

Divya Dutta: दिव्या दत्ताने एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय. दिव्या दत्ताने गुरुवारी विमानतळाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे दिव्याने एअरलाइन कंपनीच्या अनियमिततेवर फटकारलंय.

Bharat Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने इंडिगो विमान कंपनीवर सकाळी-सकाळी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर विमानतळाचा एक व्हिडिओ पोस्ट करत कंपनीच्या अनियमिततेवर राग काढलाय. हा राग काढला, असा प्रश्न पडला असेल, त्याचं झालं असं अभिनेत्री दिव्या दत्ता आपली फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर धावपळ करत गेली. परंतु तिची फ्लाईट रद्द झाली होती. एवढेच नाही तर विमानतळावर तिला एकही कर्मचारी दिसला नाही.

याउलट दिव्या दत्ताने सांगितले की, तिच्यासोबतही गैरवर्तन झाले. दिव्याने एक व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हे सर्व सांगितलंय. दरम्यान फ्लाईट रद्द केली जाणार जातेय याची कोणतीच सुचना विमान कंपनीकडून करण्यात आली नाही, त्यामुळे अभिनेत्रीचा राग अनावर झाला.

कॉम्प्यूटरवर लाईट चमकत आहेत. रिकाम्या खुर्च्या आहेत. आजूबाजूला एकही कर्मचारी नाही. हा व्हिडिओ शेअर करताना दिव्या दत्ताने लिहिले की, 'सकाळी या वाईट अनुभवासाठी धन्यवाद. उड्डाण रद्द करण्यात आले आणि कोणतीही माहिती देणे योग्य मानले गेले नाही. विमानतळाच्या गेटवरील फलकावर ही माहिती उपलब्ध आहे. विमानतळावर मदतीसाठी कंपनीचा एकही कर्मचारी नाही. तसेच गेटवर होणारा गैरव्यवहारही वेगळा आहे.

दिव्या दत्ता ही बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री आहे. दिव्याने आतापर्यंत १३८ हून अधिक चित्रपट, मालिका आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. दिव्या दत्ता अलीकडे शर्मा जी के बेटे या प्रोजेक्टमध्ये दिसली होती.IMDb नुसार, दिव्याचे 10 प्रकल्प आहेत. दिव्या दत्ताने काल तिचा वाढदिवस साजरा केला. बॉलीवूड स्टार्सनीही त्यांना वाढदिवसाच्या खास निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT