Gautami Patil  Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Gets Trolled: गौतमी पाटील नाचलेली चालते? 'ढिशक्यांव' चित्रपटावर टीका करणाऱ्यांना निर्मात्यांचा सवाल

हिंदी चित्रपटातील नंगा नाच महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला चालतो.

Pooja Dange

Marathi Film Producer on Gautami Patil: मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपट बॉलिवूडला टक्कर देत बॉक्स ऑफिस उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. यात वेड, वाळवी आणि ढिशक्यांव चित्रपटांचा समावेश आहे. 'ढिशक्यांव' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडले आहे.

'ढिशक्यांव' चित्रपटाच्या कलाकारंनी उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र काही लोकांनी चित्रपटाचे कौतुक न करता त्याची निंदा केली आहे. चित्रपट अडल्ट असल्याचे म्हणत काहींनी चित्रपटावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

या सर्व प्रकरणावर भाष्य करत असताना चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि निर्माता अहेमद देशमुखने त्याचे मत व्यक्त केले आहे. अहेमद देशमुख म्हणाला की, "मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने हा चित्रपट बनवलाय त्याचे कौतुक न करता मराठी चित्रपटांवर भाष्य करण्यात मराठीतील पाय खेचणाऱ्यांना काय समाधान मिळते तेच कळत नाही.

त्यांना हिंदी चित्रपटातील नंगा नाच महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला चालतो, मात्र मराठमोळ्या निर्मात्याने सर्व पणाला लावून निर्मित केलेला चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाहीतर काय राज्या बाहेर होणार का? हिंदी चित्रपटातील नंगा नाच चालतो, गौतमी पाटील नाचलेली चालते हे सगळं कसं चालतं", असे म्हणत त्याने थेट गौतमी पाटीलवरही निशाणा साधला आहे.

गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण सर्वांनाच ज्ञात आहे. तिने लावणीला बदनाम केल्याचा आरोप समाजातील लावणी कलावंत आणि आता राजकारणीही करू लागले आहेत. अशातच 'ढिशक्यांव' चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता अहेमद देशमुखनेही लावणीक्वीन गौतमी पाटीलचं उदाहरण देत तिला ट्रोल केलंय.

तसेच चित्रपटाची निंदा करणाऱ्या लोकांना त्याने प्रतिउत्तर करत खडेबोल लगावलेत. जर 'ढिशक्यांव' चित्रपटात अडल्ट सिन असेल तर मी आताच्या आता हा सिनेमा खाली उतरवायला लावतो' असे म्हणत त्याने थेट निंदा करणाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय.

Shahrukh Khan's Valentine Gift: गौरीनं 34 वर्षांपूर्वी किरकोळ गिफ्ट स्वीकारत शाहरुखवर विश्वास टाकला, आज राणी म्हणून जगतेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT