Ram Gopal Verma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Gopal Verma: दिग्दर्शकाच्या अश्लिल कृत्याने नेटकरी संतापले, चुंबन घेणारी अभिनेत्री नक्की कोण?; व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे बरेच चर्चेत असून राम गोपाल बरेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Chetan Bodke

Ram Gopal Verma: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दिग्दर्शक चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक राम गोपालने आतापर्यंत प्रेक्षकांना रंगीला, सत्या, कंपनी आणि सरकार सारखे उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. नव्वदीच्या काळात प्रेक्षकांना चांगल्या आशयाचे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांनी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे नव्या ट्रॅकची निवड केली की काय? असा प्रश्न उपस्थित केला.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने दिग्दर्शक राम गोपाल वर्मावर सर्वच स्तरातून टिकास्त्र सोडले जात आहे. दिग्दर्शक राम गोपाल लवकरच 'गन ऑफ थाईज' सारखाच चित्रपट बनवताना दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत राम गोपाल वर्माने एका अभिनेत्रीच्या पायाचं चुंबन घेताना दिसत आहे. त्याच्या या अश्लिल हरकतीमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकांनी कोणत्याही गोष्टीचं भान न ठेवता सर्वच परिसीमा ओलांडल्याचे दिसून येत आहे. लवकरच राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'डेंजरस' (DANGEROUS) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शकांचे हे अनोखे प्रमोशन मात्र सर्वांनाच खटकत आहे.

ज्या व्हिडिओला सर्वत्रच विरोध होत आहे, त्या व्हिडिओतील अभिनेत्री आहे तरी कोण? असा सवाल सर्वांनाच पडला होता.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका व्हिडिओत पायाचे चुंबन घेतलेल्या अभिनेत्रीचे नाव आशु रेड्डी आहे. ही एक तेलगु चित्रपटातील अभिनेत्री असून सोबतच ती सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील आहे.

तिने तेलगू चित्रपटसृष्टीत 'चल मोहन रंगा' या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिचे इंस्टाग्रामवर 1.8 मिलियनपेक्षा जास्त चाहते असून युट्युबवर 2.4 मिलियनपेक्षा सर्वाधिक चाहते आहेत. ती सध्या भारतात स्थित नसून अमेरिकेत डेलासमध्ये स्थित आहे.

आशू २०१९ मध्ये बिग बॉस तेलगूच्या सीझन ३ मध्ये सहभागी झाली होती. ती नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. जर समोर दोन हॅंडसम पुरुष असतील तर दोघांनाही एकत्र डेट करण्यासाठी गैर काय? असा प्रश्नही तिने उपस्थित केला होता. आता लवकरच आशू 'डेंजरस' चित्रपटातून ९ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT