Pravin Tarde Post On Pahalgam Terror Attack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde: 'माझा जवळचा मित्र गेला...'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिग्दर्शक प्रवीण तरडेंची मन हेलावणारी पोस्ट

Pravin Tarde Post On Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडेंनी एका भावनिक पोस्टद्वारे त्यांच्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत.

Shruti Vilas Kadam

Pravin Tarde Post On Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडेंनी एका भावनिक पोस्टद्वारे त्यांच्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यात त्यांचा जवळचा मित्र शहीद संतोष जगदाळे झाला असून, या दु:खद घटनेने ते फारच अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शहीद मित्राचा फोटो शेअर करत, "मी माझा जीवाभावाचा मित्र गमावला, अश्रूंना आता अनावर झाल्या आहेत" अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

प्रविण तरडेंनी या पोस्टमध्ये लिहीले. "आतंकवाद आज घरात आला… माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला… आम्ही काही करू शकत नाही. हल्ल्यात शहीद झालेल्या मित्राच्या शौर्याची आठवण करताना त्यांनी त्याला 'खरा देशभक्त' म्हटले आणि त्याच्या बलिदानाला सलाम केला. प्रविण तरडेंची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.

या घटनेमुळे प्रविण तरडे यांनी संतापही व्यक्त झाला. "आपण रोज शहीद होणाऱ्या जवानांच्या बातम्या ऐकतो, पण यावर कायमस्वरूपी तोडगा का निघत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रिया अनेक चाहत्यांच्या मनाला भिडल्या आहेत.

प्रविण तरडेंनी शेवटी आपल्या पोस्टमध्ये सर्व नागरिकांना आवाहन केले की, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाला आपण विसरू नये. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना साथ दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT