मुंबई : 'शमशेरा' हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांसारखे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २२ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. चित्रपट रिलीज होण्याआधी हे सर्व स्टार्स या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
दरम्यान, या चित्रपटाचा दिग्दर्शक करण मल्होत्राने देखील प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकारांबद्दल मनोरंजक किस्से सांगितले आहेत. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि संजय दत्तची (Sanjay Dutt) स्तुती केल्यानंतर आता दिग्दर्शकाने वाणी कपूरचेही कौतुक केले. वाणी कपूर हिंदी चित्रपटसृष्टीची 'बेमिसाल अभिनेत्री' होऊ शकते, असे दिग्दर्शकाने म्हटले आहे.
'शमशेरा'मध्ये रणबीर कपूर पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो शमशेरा आणि बल्लीच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे, संजय दत्त या चित्रपटात क्रूर सेनापती शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री वाणी कपूर (vaani kapoor) नृत्यांगना सोनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
वाणीच्या व्यक्तिरेखेबाबत दिग्दर्शक करण मल्होत्राने सांगितले की, रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या व्यक्तिरेखेसारखीच अभिनेत्री वाणी कपूरची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. वाणीच्या व्यक्तिरेखेचे वर्णन करताना करण मल्होत्राने सांगितले, 'वाणी चित्रपटात सोना नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. जी एक कलाकार आहे. ती कोणत्याही प्रकारची गुप्तहेर नाही. पण ती फक्त गाण्यासाठी आणि नाचण्यासाठीही या चित्रपटात नाही.
'शमशेरा'मधील रणबीरच्या भूमिकेत वाणीचे पात्र अधिक महत्वपूर्ण आहे. दिग्दर्शकाच्या मते, चित्रपटातील वाणीचे पात्र अप्रतिम आहे आणि वाणीचं पात्र एक साइन आहे जे शमशेराच्या भूमिकेमागे एक मजबूत शक्ती बनते. वाणीचा प्रवास खूपच रंजक आहे. शमशेरामध्ये तुम्ही तिचे वेगळे रूप पाहाल'. असे दिग्दर्शकाने म्हटले आहे.
मुलाखतीत करणने हे देखील कबूल केले की तो वाणी कपूरचा पहिला चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स' पासून चाहता आहे. 'वाणीला कास्ट करण्यामागील कारण म्हणजे तिच्या पहिल्या चित्रपटापासून मी तिचा फॅन आहे. पडद्यावर ती खूप उत्तम प्रकारे आपले पात्र साकारते. मला नेहमी वाटत होते की वाणी ही हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होऊ शकते. ती कोणतेही पात्र सहज साकारू शकते. शमशेरामुळे मला तिचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली', असे दिग्दर्शक करण मल्होत्रा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.