अमिताभ बच्चन यांच्या मागे बसलेल्या हा मुलगा गाजवतोय बॉलिवूड; जाणून घ्या नक्की कोण आहे हा सुपरस्टार?

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Amitabh Bachchan post his throwback photo
Amitabh Bachchan post his throwback photo Saam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी नुकताच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन एक स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत. गंमत म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमधील छोट्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या मागे बसलेला हा गोंडस मुलगा आता बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार आहे. जो आता वयाच्या ४८ व्या वर्षी बॉलिवूडवर राज्य करत आहे. या छोट्या स्टारला बॉलिवूडमध्ये येऊन जवळपास २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांत या स्टारने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. नक्की कोण आहे हा सुपरस्टार?

Amitabh Bachchan post his throwback photo
साई पल्लवीला आठवलं बालपणीचे प्रेम, लव्ह लेटर लिहिल्याचं पालकांना समजले अन्...

अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत "मी चित्रपटासाठी गायलेले पहिले गाणे... 'मेरे पास आओ...' 'मिस्टर नटवरलाल'साठी. म्युझिक डायरेक्टर राजेश रोशनसोबत म्युझिक रिहर्सल करताना. मागे छोट्या बेंचवर बसलेला मुलगा... नक्कीच हृतिक रोशन.' असे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Amitabh Bachchan post his throwback photo
रणबीर कपूरला आलिया भट्टसोबत वाटतं सुरक्षित; म्हणाला, बाळाच्या स्वागतासाठी...

'मेरे पास आओ' हे अमिताभ बच्चन यांचे पहिले गाणे होते, जे त्यांनी 'मिस्टर नटवरलाल' या चित्रपटासाठी गायले होते. म्युझिक रिहर्सल दरम्यान, छोटा हृतिक रोशन(Hrithik Roshan) त्याचे काका आणि संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांच्यासोबत रिहर्सलसाठी गेला होता. हा फोटो 'मिस्टर नटवरलाल' या चित्रपटाच्या म्युझिक रिहर्सल दरम्यान घेतलेला आहे. जो अमिताभ बच्चन यांनी शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हृतिक रोशनने २००० साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केला आहे. २१ वर्षात हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्याने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या पहिल्याच चित्रपटातून अनेक पुरस्कार जिंकणारा हृतिक रोशन फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com