Fakaat New Marathi Comedy Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Fakaat: 'सातारचा सलमान' नंतर हेमंत ढोमे आणतोय 'फकाट', अंतरंगी नावाचा आणखी एक कॉमेडी सिनेमा

दिग्दर्शक श्रेयश जाधव लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.

Chetan Bodke

Fakaat: मराठी सिनेसृष्टीला 'बघतोस काय मुजरा कर', 'बस स्टॉप', 'बाबू बॅन्ड बाजा', 'ऑनलाईन बिनलाईन',' मी पण सचिन' यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी श्रेयश जाधव यांनी 'मी पण सचिन'चे लेखन, दिग्दर्शन केले होते. आता आणखी एका नवीन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

'फकाट' असे आगळेवेगळे नाव असणारा हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेल्या या चित्रपटात हेमंत ढोमे, अविनाश नारकर, सुयोग गोऱ्हे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट, गणराज स्टुडिओ प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाच्या निता जाधव निर्मात्या आहेत.

पोस्टरवर हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांच्या दोघांच्या मध्ये अविनाश नारकर एक पाकीट घेऊन उभे आहेत. या पाकिटावर कॉन्फिडेन्शिअल असे लिहिले आहे. आता या पाकिटात काय गुपित दडले आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल.

दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, "पुन्हा एकदा एक धमाल चित्रपट घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा ॲक्शन कॅामेडी चित्रपट असून सध्यातरी यातील अनेक गोष्टी कॉन्फिडेन्शिअल आहेत. येतील हळूहळू समोर. हा एक कौटुंबिक सिनेमा असून 'फकाट' प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Care : थंडीत मुलायम त्वचेसाठी लावा 'हा' पदार्थ, कोरडेपणा मिनिटांत होईल दूर

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

Maharashtra Live News Update : नाशकात २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे हाती घेतली आहेत - देवेंद्र फडणवीस

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांचा खून ..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

SCROLL FOR NEXT