
Evergreen Holi Song Connection With Bachchan's: होळीचे रंगात रंगण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. होळी सणाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने तयारी करत आहे. या सगळ्यात आनंद महत्त्वाची आहेत होळीची गाणी. तर या गाण्यांमध्ये ‘रंग बरसे भीगे चुनरवाली…’ गाणे नाही असं होऊच शकत नाही.
‘रंग बरसे भीगे चुनरवाली…’ हे होळीचे ऑल टाईम फेव्हरेट गाणे आहे. 'सिल्सिला' या चित्रपटातील हे गाणे आज देखील होळीला वाजते. या गाण्यात रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाची एक झलक दिसून आली. परंतु आज आपण या गाण्यातील कलाकारांच्या प्रेमाविषयी नाहीतर तर गाण्याविषयी जाणून घेणार आहोत.
‘रंग बरसे भीगे चुनरवाली…’ या गाण्याला अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय राय बच्चन यांनी एक विशेष वळण दिले होते. त्यामुळे या गाण्यातील गोडवा अजूनही कायम आहे.
१९८१मध्ये यश चोप्रा यांनी 'सिल्सिला' सुंदर चित्रपट आणला. या चित्रपटात अमिताभ आणि रेखा यांच्यासमवेत जया भादुरी आणि संजीव कुमारही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. चित्रपटातील एक सीन होळीवर आधारीत होता. यासाठी यश चोप्रा यांना एक होळीचे गाणे हवे होते जे केवळ होळी सण दाखविण्यासाठी नव्हे तर प्रेक्षकांच्या मनात होळीची वातावरण निर्मिती करण्यासाठी हवे होते. यासाठी, हरिवंशराय बच्चन यांच्यावर हे गाणे लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली.
यश चोप्रा यांना नेमके काय हवे आहे हे हरिवंशराय बच्चन यांनी जाणले आणि असे गाणे तयार केले. हे गाणे अजूनही होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र गायिले आणि वाजविले जाते. हरिवंशराय यांनी हिंदीबरोबर गाण्यामध्ये अवधी शब्दांचा समावेश केला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी मीराच्या स्तोत्रामधील आहेत.
रंग बरसे ओ मीरा, भवन में रंग बरसे…
कौन ऐ मीरा तेरो मंदिर चिनायो
क्यों चिनयो तेरो देवरो…
रंग बरसे ओ मीरा, भवन में रंग बरसे…
गाण्यात प्रेमाचे रंग भरताना हरिवंशराय यांनी हा एक वेगळा मार्ग वापरला आहे. गाण्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगीत आणि आवाज. 6 मिनिटांचे हे गाणे अमिताभ बच्चन यांनी गायले आहे. अमिताभ यांच्या आवाजामुळे गाण्याची रंगात आणखी वाढली आहे. गाण्याचे संगीत तयार करताना भारतीय वाद्यांचा वापर विशिष्ट्य पद्धतीने केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.