Dipika Kakar Blessed With Baby Boy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar Blessed With Baby Boy : लग्नाच्या 5 वर्षांनंतर बिग बॉस विजेती अभिनेत्री बनली आई; 'बापमाणूस' शोएबची इमोशनल पोस्ट

Tv Couple Dipika Kakar-Shoaib Ibrahim : 'ससुराल सिमर का' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेलं फेमस कपल दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dipika Kakar-Shoaib Ibrahim Blessed With Baby Boy Latest News : 'ससुराल सिमर का' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेलं फेमस कपल दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. दीपिका आणि शोएबला पुत्ररत्न प्राप्त झालंय. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे.

'बिग बॉस १२'ची विजेती दीपिका कक्कर ही लोकप्रिय अभिनेत्री (Actress) आहे. 'ससुराल सिमर का' फेम दीपिका आणि शोएब हे खऱ्या आय़ुष्यातही पती-पत्नी आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. अभिनयाबरोबरच या दोघांचे युट्यूब चॅनलही आहेत. दीपिका-शोएबला मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

आज २१ जून २०२३ रोजी सकाळी (Morning) आम्हाला मुलगा झाला आहे. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असली तरी काळजी करण्याचे कारण नाही, असं शोएबनं सोशल माडियावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. दीपिका-शोएब हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच 'गुड न्यूज' दिली होती.

'ससुराल सिमर का',' नच बलिये' या शोमध्ये दीपिका-शोएबची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या दोघांनीही २०१८ साली लग्नगाठ बांधली. जानेवारी २०२३ मध्ये या दोघांनी सोशल मीडियावरून नवीन पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी दिली होती. दीपिका गरोदरपणाच्या काळातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. दीपिका-शोएब नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल युट्यूबच्या व्लॉग्समध्ये बोलत असतात.

अभिनय सोडणार असल्याची केली होती घोषणा

अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची घोषणा अलीकडेच एका मुलाखतीत दीपिकाने (Dipika Kakar) केली होती. आईपणाचा संपूर्ण काळ आनंदात घालवणार असल्याचंही ती म्हणाली होती. दीपिकाच्या या घोषणेने चाहत्यांना मात्र धक्काच बसला होता.

दीपिकाने काल म्हणजे २० जूनला पती शोएबचा वाढदिवस साजरा केला. त्याच्यासाठी खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबनेही आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकत आहे, अशी इमोशनल पोस्ट शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT