Diljit Dosanjh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझला त्याच्या "अमर सिंह चमकिला" या चित्रपटासाठी २०२५ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे.

Shruti Vilas Kadam

Diljit Dosanjh: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. २०२५ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन त्याच्या नेटफ्लिक्स चित्रपट "अमर सिंह चमकिला" साठी मिळालं आहे. परिणीती चोप्रा अभिनीत या चित्रपटात दिलजीतने पंजाबी गायक चमकिलाची भूमिका साकारली होती.

"अमर सिंह चमकिला" हा चित्रपट इम्तियाज अलीने दिग्दर्शित केला आहे. यात पंजाबमधील दलित चमकिलाचा संगीत आयकॉन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तो त्याच्या वादग्रस्त गाण्यांसाठी ओळखला जात होता. त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या पत्नीचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी चमकिला फक्त २७ वर्षांचा होता. हा चित्रपट १२ एप्रिल २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

ए.आर. रहमान यांनी दिलं संगीत

दिलजीत दोसांझ यांनी अमरजीत चमकिलाची भूमिका केली होती आणि परिणीती चोप्राने त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी ए.आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटातील विदा करो हे गाणं विशेष गाजलं.

दिलजीत 'सरदार जी ३' मध्ये दिसला होता

दिलजीत अमर हुंडल यांच्या 'सरदार जी ३' मध्ये दिसला होता. यामध्ये नीरू बाजवा, गुलशन ग्रोव्हर आणि सपना पब्बी यांनीही काम केलं आहे. हा चित्रपट २७ जून रोजी परदेशात प्रदर्शित झाला होता. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या रोलमुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. यासह दिलजीत लवकरच 'बॉर्डर' च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT