पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ-अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित असलेला 'पंचक' चित्रपट (Panchak Movie) येत्या नवीन वर्षामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी निर्मिती केलेला 'पंचक' ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टायटल साँगनंतर आता नवीन भावनिक गाणं 'चमत्कार' (Chamatkar Song) प्रदर्शित झालं आहे.
'पंचक' चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुंदर गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा...' असे बोल असलेले हे गाणं आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे. तर अभिजीत कोसंबी यांनी हे गाणं गायलं आहे. हे भावनिक गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. अल्पवाधितच या गाण्याला खूप चांगले व्ह्यूज आणि लाइक मिळाले आहे.
पंचकमधील या भावनिक गाण्यामध्ये गुरु ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. हे गाणं खूपचं भावनिक आणि मनाला भिडणारे आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे गाणे आहे. पंचक चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या पंचकचे टायटल साँग प्रदर्शित झाले होते. ते गाणं देखील खूपच जबरदस्त आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळी-वेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे. हे गाणं ऐकायला जितकं जबरदस्त आहे तितकंच ते पाहायला देखील धमाल आणि मजेदार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.