Sridevi Prasanna  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi movie Song : "श्रीदेवी प्रसन्न" चित्रपटाचं “दिल में बजी गिटार” पहिलं गाणं प्रदर्शित; मराठी सिनेमात हिंदी गाण्याचा तडका

Sridevi Prasanna movie: "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातून टिप्स फिल्म मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत.'देखा जो तुझे यार', हे टिप्स चे गाणे वेगळ्या ढंगात सादर करण्यात आलं आहे. त्याचा लाँच इव्हेंट तितक्याच शानदार पद्धतीने पार पडला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sridevi Prasanna Marathi movie song Dil Mein Baji Guitar:

"श्रीदेवी प्रसन्न" मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलर ला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ ह्यांच्या फिल्म साठी लोक किती उत्सुक आहेत. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Latest News)

'देखा जो तुझे यार', या हिंदी गाण्याने अख्या बॉलिवूडमध्ये धूम केली होती. आता हे गाणे नव्या ढंगात मराठी चित्रपट श्रीदेवी प्रसन्नमध्ये दाखवण्यात येणार आहे. विशेष हे गाण्याने चित्रपट निर्मिती कंपनी टीप्स फिल्मचेच आहे. "श्रीदेवी प्रसन्न, या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी चित्रपट लोकांपर्यंत आणावी हाच ह्या चित्रपटामागचा थॉट आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट नव्या अप्रोचने प्रेक्षकांसमोर आणण्यात क्रीएटिव्ह प्रोड्युसर्स नेहा शिंदे आणि अविनाश चाटे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चित्रपटात सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा ह्यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

कुमार तौरानी,व टिप्स फिल्मस लि. हे मराठी चित्रपट सृष्टीतल्या आपल्या एंट्री बद्दल होपफ़ुल आहेत. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत. ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही सुरु राहील ह्याची त्यांना आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT