यामी गौतम, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांचा चित्रपट २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक दमदार राजकीय चित्रपट Article 370 सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामी गौतम अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.आदित्य सुहास जांभळे यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
Artical 370 हे कलम 370 निष्क्रिय करण्याच्या आणि तेथून दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्याच्या काश्मीरच्या संकल्पावर आधारित एक अॅक्शन आणि कृतीशील राजकीय नाट्य आहे. चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करून, निर्मात्यांनी एक रोमहर्षक पोस्टर जारी केलं आहे. ज्यामध्ये यामी गौतम गुप्तचर एजंटच्या भूमिकेत आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये अॅक्शन आणि राजकारण याआधी कधीही न पाहिलेला पाहायला मिळणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जिओ स्टुडिओ आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइकच्या निर्मात्यांकडून, आर्टिकल 370 हा एक कठोर अॅक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे. ज्यात अभिनेत्री यामी गौतम आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांचं दिग्दर्शित आहे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर निर्मित, चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.