Keerthy Suresh: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या तिच्या आगामी 'सत्यवान सावित्री' (Satyavan Savitri) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज म्हणजे २० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अभिनेत्री सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत घडलेल्या एका प्रसंगामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमातील दिग्दर्शक-अभिनेते मिस्किन आणि कीर्ती सुरेश यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कीर्तीने ट्रोलला चांगलेच सुनावले आहे.
'सत्यवान सावित्री' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेला कीर्ती सुरेशसोबत दिग्दर्शक आणि अभिनेते मिस्किनदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात मिस्किन यांनी कीर्तीचे भरभरून कौतुक केले. तसेच ती आपल्यासाठी मुलीसारखी असल्याचेही त्यांनी सांगितले. याच संवादादरम्यान त्यांनी कीर्तीच्या पायाला स्पर्श केला. या प्रसंगाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर काही नेटकऱ्यांनी या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना कीर्ती दिग्दर्शकाच्या कृतीमुळे अस्वस्थ झाल्याचे म्हटले. एका 'X' युजरने तर अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हावभावांवर टिप्पणी करत तिला प्रश्न विचारला. चित्रपटांमध्ये अशा गोष्टी घडतात, मग सार्वजनिक कार्यक्रमात ती अस्वस्थ का झाली, असा प्रश्न विचारणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या.
या पोस्ट पाहून अभिनेत्री कीर्ती सुरेशने नेटकऱ्याना चांगलेच सुनावले. कीर्तीने म्हटले की, सर्वप्रथम माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव कुठे दिसले, हे सांगावे. एखाद्या चित्रपटात कलाकारांना स्पर्श केला जातो, म्हणून सार्वजनिक ठिकाणीही अशा प्रकारचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांनी सहज तयार असावे का? माझे आणि मिस्किन यांचे नाते वडील-मुलीसारखे आहे. आधी सर्वांना वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत तिने सुनावले. कीर्तीच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिची बाजू घेतली. अखेर संबंधित नेटकऱ्याने अभिनेत्रीची माफी मागितली. आपला कोणताही वाईट हेतू नव्हता आणि व्हायरल होत असलेली पोस्ट आपण शेअर केली होती, असे त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, कीर्ती सुरेश लवकरच 'सत्यवान सावित्री' या कोर्टरूम ड्रामामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण एस. विजय दिग्दर्शित या चित्रपटात मिस्किन, बाला सरवनन, मधुसूदनन, ब्रिजिडा आणि माला पार्वती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी कीर्ती नेटफ्लिक्सच्या 'अक्का' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्यामुळे आता तिच्या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.