Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 : 'रणवीर सिंह'नं केलं 'कपिल शर्मा'ला धोबीपछाड, पहिल्या दिवशी 'किस किसको प्यार करू 2' ने कमावले फक्त 'इतके' कोटी

Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 Box Office Collection : सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा 'धुरंधर' आणि कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' चित्रपट पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'किस किसको प्यार करू 2' सिनेमा 12 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.

'किस किसको प्यार करू 2' चित्रपट ही कॉमेडी, लव्ह स्टोरी आहे.

सध्या आठवडाभर रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाची हवा पाहायला मिळाली. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. तर काल (12 डिसेंबर) ला कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' सिनेमा रिलीज झाला आहे. कपिलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

रणवीरच्या 'धुरंधर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 28 कोटी रुपये कमावले आहेत. तर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 207.25 कोटींची कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने 8 व्या दिवशी 32.00 कोटी ही बंपर कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचे एकूण व्यवसाय  239.25 कोटी रुपये झाला आहे.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.00 कोटी रुपये

  • एकूण - 239.25 कोटी रुपये

'किस किसको प्यार करू 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' चित्रपट ही कॉमेडी, लव्ह स्टोरी आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार,'किस किसको प्यार करू 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'किस किसको प्यार करू ' हा चित्रपटाचा पहिला भाग 2015 ला रिलीज झाला होता. पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागाची कमाई खूपच कमी झाली आहे.

कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू 2' मध्ये त्रिधा चौधरी, आयशा खान, वारिना हुसेन, पारुल गुलाटी आणि मनजोत सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. 'धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'धुरंधर' रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भिवंडी शहरातील कचेरी पाडा परिसरात लाकडाच्या वखाराला भीषण आग

Esakal No.1: मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये गाठले पहिल्या क्रमांकाचे स्थान 

Mumbai Shocking : रात्री झोपेतून लघवीसाठी घराबाहेर गेला; तरुण जाळी तुटलेल्या विहिरीत पडला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saree Reuse Dress: लग्न ते डेली वेअरसाठी; आईच्या जुन्या साडीपासून शिवता येतील या ७ युनिक पॅटर्नचे ट्रेंडी ड्रेसेस

Shocking: नवऱ्याचे गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध, बायकोने नको त्या अवस्थेत पकडलं; व्हिडीओ काढला अन्...

SCROLL FOR NEXT