Ranveer Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

Dhurandhar Star Ranveer Singh Casting Couch Experience : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे, मात्र सुरूवातीच्या काळात रणवीर सिंहला देखील अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' रणवीर सिंहच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट ठरला.

रणवीर सिंह आता लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

रणवीर सिंहने करिअरच्या सुरूवातीच्या काळात इंडस्ट्रीत खूप संघर्ष केला.

'कास्टिंग काउच' हे मनोरंजन विश्वातील एक काळे वास्तव आहे. इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात अनेक कलाकारांना याचा अनुभव येतो. हा भयानक अनुभव अंगावर काटा आणणारा असतो. आपण अनेक वेळा मुलाखतीत ऐकतो की, आपल्या आवडत्या कलाकारांसोबत किंवा बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटी सोबतही असे किस्से घडले आहेत. बॉलिवूडचा 'धुरंधर' रणवीर सिंहसोबत देखील करिअरच्या सुरूवातीच्या काळात कास्टिंग काउचसारखा भयंकर प्रकार घडला होता. रणवीर सिंहने एका जुन्या मुलाखतीत सांगितलेला त्याचा किस्सा वाचा.

TOI च्या वृत्तानुसार, माराकेश चित्रपट महोत्सवातील एका संवादादरम्यान, 'धुरंधर' स्टार रणवीर सिंहने 'कास्टिंग काउच'चा आपला अनुभव सांगितला होता. रणवीर मुंबईतील आपल्या साडेतीन वर्षांच्या संघर्षाच्या काळाबद्दल बोलत होता. त्याने सांगितल्याप्रमाणे, त्याच्याकडे कोणताही करिअरसाठी निश्चित मार्ग नव्हता आणि त्याचे प्रयत्न म्हणजे अंधारात चाचपडण्यासारखे होते. या अनिश्चित काळात, सहाय्यक दिग्दर्शकाची कामे करताना आणि नाट्यमंडळांमध्ये काम करताना, त्याला अनेकदा आपल्या करिअर आणि यशावर शंका निर्माण झाली.

रणवीरने पुढे सांगितले की, एका प्रसिद्ध निर्मात्याने त्याला एका खाजगी पार्टीसाठी बोलावले होते आणि केवळ आपल्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी रणवीरवर आपला कुत्रा सोडला होता. पण जेव्हा एका दुसऱ्या संधीसाधूने रणवीरला सोबत नेऊन प्रपोज (ऑफर दिली) केले, तेव्हा गोष्टी संशयास्पद वळण घेऊ लागल्या. 'डेडलाइन'च्या एका लेखात रणवीरने म्हटले आहे, "हा माणूस मला एका गलिच्छ ठिकाणी बोलावतो आणि विचारतो, ‘तू मेहनती आहेस की हुशार?’ मी स्वतःला हुशार समजत नव्हतो, म्हणून मी म्हणालो- 'मला वाटतं मी मेहनती आहे.' तो म्हणाला, "प्रिये, हुशार हो, सेक्सी हो..." त्या साडेतीन वर्षांच्या काळात मला असे सर्व अनुभव आले आणि मला वाटतं की तोच काळ होता ज्यामुळे मला आता मिळणाऱ्या संधींची किंमत कळाली..."

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. दोघांनी 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'राम लीला' हे चित्रपट एकत्र केली. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. दीपिका पादुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2024 मध्ये तिने गोंडस मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'दुवा' असे आहे. आता पुन्हा एकदा दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. अलिकडेच दीपिकाने आपल्यासेकंड प्रेगनेंसी घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT