Akshaye Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna: ल्यारीचा बादशाहा होणार राक्षस गुरु शुक्राचार्य; 'महाकाली'मधला अक्षय खन्नाचा अंगावर काटा आणणारा लूक लीक

Akshaye Khanna: 'धुरंधर' चित्रपटामध्ये रहमान डकैतच्या भूमिकेतून आपली छाप पाडणारा अक्षय खन्ना, आता 'महाकाली' या चित्रपटात असुरगुरू शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा नवीन लूक लीक झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Akshaye Khanna: आदित्य धर यांच्या धुरंधर (Dhurendhar) या चित्रपटात 'रहमान' या दरोडेखोराची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता अक्षय खन्ना सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, पहिल्या भागात रहमानच्या मृत्यूनंतरच्या कथाची या भागात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता अक्षय खन्नाच्या पुढील प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अक्षय खन्नाने आपल्या आगामी महाकाली या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तो ‘असुर गुरु’ शुक्राचार्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला असून, तो एका ऋषी-मुनींसारखा दिसणार आहे. लांब पांढरी दाढी, केस आणि पारंपरिक वेशभूषेमुळे त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. नुकताच त्याचा ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाचे सुमारे ४० दिवसांचे शूटिंग अजून बाकी असून, ते हैदराबादमध्ये पूर्ण होणार आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. विविध आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय खन्नासाठी हा चित्रपट आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी सेटवरील अक्षयचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, “तुमचे पडद्यावरील काम अप्रतिम आहे आणि आपण एकत्र काय साकारत आहोत हे जगाला दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे,”

या चित्रपटात अभिनेत्री भूमी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महाकाली हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा एक भाग असून, या माध्यमातून एका महिला सुपरहिरोचे वेगळ्या शैलीत सादरीकरण केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT