Dhurandhar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 3: 'लियारीची स्टोरी अजून संपली नाही; 'धुरंधर ३'ची तयारी सुरु? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

Dhurandhar 3: आदित्य धरच्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे. ‘धुरंधर 2’च्या प्रचंड यशानंतर आता तिसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 3: बॉलिवूडमधील सुपरहिट ठरलेल्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’च्या प्रचंड यशानंतर आता तिसरा भाग येणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चर्चेला आणखी हवा मिळाली ती निर्माती ज्योती देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योती देशपांडे यांनी ‘धुरंधर’ फ्रँचायझी अद्याप संपलेली नसल्याचे संकेत दिले. धुरंधरचं काम अजून संपलेल नाही. यावर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राइज असणार आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘धुरंधर 3’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-अॅक्शन फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. विशेषतः रणवीर सिंगच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तसेच या चित्रपटातील प्रत्येक सस्पेन्स खूप अनपेक्षित आणि प्रेक्षकांसाठी धक्कादायक होते. त्यामुळे आगामी भागात रणवीर पुन्हा दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार ‘धुरंधर’ चा आगामी भाग पुन्हा आणण्याची तयारी सुरू असून, स्पिन-ऑफ, डॉक्युमेंटरी किंवा तिसऱ्या भागाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुरंधर या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांसारख्या दमदार कलाकारांनी उत्तम काम केलं आहे.

५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर या चित्रपटाने जगभरात ३१०० कोटींची कमाई केली. तर, १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर २ ने संपूर्ण जगभरात १८०० पेक्षा जास्त कोटींची कमाई केली. आता जर धुरंधर ३ या दोन्ही चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करेल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT