Dhurandhar Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर' 600 कोटींपासून काही पावलं दूर; तर 'अवतार'नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, वाचा कलेक्शन

Dhurandhar Box Office Collection Day 17 : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट लवकरच 600 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तिसऱ्या रविवारी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सर्वत्र 'धुरंधर' ची चर्चा पाहायला मिळत आहे.

'धुरंधर' लवकरच 600 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

तर 'अवतार'ने 50 कोटींवर कमाई केली आहे, जी 'धुरंधर'च्या तुलनेत खूपच कमी आहे.

रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट विको कौशलच्या 'छावा' चित्रपटाला तगडी टक्कर देत आहे. 'धुरंधर' लवकरच 600 कोटीचा टप्पा पार करणार आहे. वीकेंडला 'धुरंधर' चे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. तसेच 'धुरंधर' सोबत बॉक्स ऑफिसवर जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: फायर अँड ॲश' देखील पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 19 डिसेंबर 2025ला रिलीज झाला आहे.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटाने रिलीजच्या 17 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 38.50 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 555.75 कोटी रुपये झाले आहे. 17 दिवसांत 'धुरंधर'ने जगभरातील 845 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'धुरंधर' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर हॉलिडूचा भव्य चित्रपट 'अवतार: फायर अँड ॲश'ला मागे टाकले आहे.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • नववा दिवस - 53 कोटी रुपये

  • दहावा दिवस -58 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 30.5 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 30.00 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 25.5 कोटी रुपये

  • चौदावा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 22.5 कोटी रुपये

  • सोळावा दिवस - 34.25 कोटी रुपये

  • सतरावा दिवस - 38.50 कोटी रुपये

  • एकूण - 555.75 कोटी रुपये

'अवतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'अवतार'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 25.00 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटाने 66.25 कोटी कमावले आहेत.

  • पहिला दिवस - 19 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 22.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 25.00 कोटी रुपये

  • एकूण - 66.25 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'धुरंधर'ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे सोडले आहे. यात रणबीरचा अ‍ॅनिमल (553 कोटी रुपये), शाहरुख खानचा पठाण (543 कोटी रुपये) आणि गदर 2 (525 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. आता 'धुरंधर'च्या निशाण्यावर 'जवान', 'छावा' चित्रपट पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iron Clothes : लाईट गेल्यावर कपडे इस्त्री कसे करावे? जाणून घ्या टिप्स

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक समस्या सुटतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये उबाठा गटात तुंबळ हाणामारी

ऐन निवडणुकीत शिवसेनेवर दु:खाचा डोंगर; सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

Aga Aga Sunbai: सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी; ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT