Samantha Ruth Prabhu : पाय लटपटले, पदर ओढला; समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली, पाहा व्हायरल VIDEO

Samantha Ruth Prabhu Viral Video : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्री अडकलेली पाहायला मिळत आहे.
Samantha Ruth Prabhu Viral Video
Samantha Ruth Prabhu saam tv
Published On
Summary

साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली.

गर्दीत चाहत्यांनी समांथाला धक्काबुक्की केली.

हैदराबादमध्ये समांथासोबत ही घटना घडली.

साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे. अलिकडेच तिने दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले. अशात आता समांथाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चाहते तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

समांथा रुथ प्रभू हैदराबादमधील एका स्टोअरच्या लाँच इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. कार्यक्रम संपवून निघताना समांथा रुथ प्रभूला चाहत्यांनी घेरले. बॉडीगार्डच्या मदतीने वाट काढत समांथा कशीबशी गाडीपर्यंत पोहोचली. चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी, तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी तिच्या मागे जात होते. आरडाओरडा करत होते. काही दिवसांपूर्वी निधी अग्रवाल देखील अशीच चाहत्यांच्या गर्दीत अडकली होती. तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणी समांथाच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे. तर कोणी तिला ढकलताना दिसत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काहीजण गर्दीत खाली देखील पडले. मात्र ही परिस्थिती समांथा रुथ प्रभूने शांतपणे हाताळली. ती गर्दीतून रस्ता काढण्याचा प्रयत्न करताना दिसली. समांथा रुथ प्रभूच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

समांथाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच चाहत्यांवर टीका देखील केली आहे. या कार्यक्रमासाठी समांथाने सुंदर काळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. यावर तिने सिंपल स्लीवलेस ब्लाउज परिधान केला होता. मिनिमल ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप, मोकळे केस आणि कपाळावर काळी बंदी लावून तिने हा लूक पूर्ण केला होता. समांथा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Samantha Ruth Prabhu Viral Video
Marathi Actress : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हाताला गंभीर दुखापत, VIDEO पाहून चाहते चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com