Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; रणवीर सिंहने रचला इतिहास; सहाव्या दिवशी किती गल्ला जमवला?

Dhurandhar The Revenge - Box Office Collection Day 6 : रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. चित्रपटाने सहा दिवसांत ५५० कोटींच्या पार कमाई केली आहे.

Shreya Maskar

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026ला रिलीज झाला.

'धुरंधर 2' मध्ये रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, याचा उलगडा केला आहे.

'धुरंधर 2' ने ५५० कोटींच्या पार कमाई केली आहे.

आदित्य धरच्या थरारक स्पाय थ्रिलर चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने सहा दिवसांत बंपर कमाई केली आहे. 'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणवीर सिंहने चित्रपटात आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. 'धुरंधर 2' हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, याचा उलगडा 'धुरंधर 2'मध्ये होतो.

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

Sacnilk च्या माहितीनुसार, सहा दिवसांनंतर 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची देशांतर्गत कमाई ५७५.६७ कोटी रुपये इतकी झाली आहे. तर भारतातील एकूण (Gross) ६८७.४३ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने परदेशातील एकूण कलेक्शन २३१.५७ कोटी रुपयांचा टप्पा यापूर्वीच ओलांडला असून, यामुळे त्याचे जगभरातील एकूण कमाई ९१९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने ५६.५५ कोटी रुपयांची कमाई केली. परिणामी, भारतातील या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५७५.६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात हिंदीत चित्रपटाने ५२ कोटी रुपये कमावले.

  • दिवस पहिला - १०२ कोटी रुपये

  • दिवस दुसरा - ८०.७२ कोटी रुपये

  • दिवस तिसरा - ११३ कोटी रुपये

  • दिवस चौथा - ११४.८५ कोटी रुपये

  • दिवस पाचवा - ६५ ​​कोटी रुपये

  • दिवस सहावा - ५६.५५ कोटी रुपये

  • एकूण - ५७५.६७ कोटी रुपये

'धुरंधर २' ने ६ व्या दिवशी 'या' चित्रपटांना टाकले मागे

'धुरंधर २' ने जगभरात 919 कोटींची कमाई केली आहे. 'धुरंधर २'ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ चित्रपटांच्या यादीत प्रवेश केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर २'ने 'बाहुबली २' हिंदी - ५११ कोटी, 'गदर २' - ५२५ कोटी, 'पठाण'- ५४३ कोटी, 'ॲनिमल' - ५५६ कोटी रुपये या चित्रपटांना मागे टाकले आहे.

'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT