Dhurandhar 2 Saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची त्सुनामी! रणवीरने मोडले आमीर-शाहरुख-सलमानचे रेकॉर्ड, असा पराक्रम करणारा पहिलाच हिरो

Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करत इतिहास रचला. बॉलिवूडमधील सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला चित्रपट ठरला.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2: बॉलिवूडमध्ये सध्या आदित्य धर आणि रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे, रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ऐतिहासिक कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्याचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंग आणि पेड प्रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसून आला. रिलीजच्या आधीच झालेल्या पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने तब्बल 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली, जी बॉलिवूडसाठी एक मोठी पेड प्रिव्ह्यू कमाई आहे.

पहिल्या दिवशी सकाळपासूनच चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळपर्यंत चित्रपटाने सुमारे 70 ते 80 कोटींची कमाई केली होती आणि अखेर दिवसाअखेर हा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला. त्यामुळे ‘धुरंधर २’ने ‘जवान’सारख्या मोठ्या चित्रपटांचाही रेकॉर्ड मोडल्याची चर्चा रंगली आहे.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-ॲक्शन चित्रपटाला मल्टिप्लेक्स आणि ओव्हरसीज मार्केटमध्ये विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात स्क्रीन रिलीज, दमदार स्टारकास्ट आणि फ्रँचायझीमुळे चित्रपटाला ओपनिंगपासूनच फायदा झाला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केल्यामुळे ‘धुरंधर २’ आता 500 कोटीं टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT