Dharmendra Workout Video Viral Twitter
मनोरंजन बातम्या

Dharmendra Workout Video: या वयातही इतकं फीट! ८७ वर्षांच्या धर्मेंद्र यांचा वर्कआऊट पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

Dharmendra News: सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा जिम वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Dharmendra Workout Video Viral

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र नुकतेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यासोबतच मध्यंतरी अमेरिकेमध्ये फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत असताना ते आजारी असल्याच्याही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, ती बातमी खोटी असल्याचे सांगितले. अशातच पुन्हा एकदा धर्मेंद्र सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण त्यांची फिटनेस आहे. सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते व्यायाम करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र वयाच्या ८७ व्या वर्षी सुद्धा सायकलिंग करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते या वयात उत्साहाने व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र नवीन चित्रपटाची तयारी करत आहेत, असे ते म्हणत आहेत. मला सायकलिंग करून अर्धा तास झाला असल्याचे सांगत ते त्यांच्या चित्रपटातील एक डायलॉग बोलतात. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला असून ते धर्मेंद्र यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करीत आहेत.

धर्मेंद्र फिटनेस फ्रिक असून ते कायमच आपल्या फिटनेसकडे प्रामुख्याने लक्ष देत असतात. एवढेच नाही, तर बॉलिवूडचा दबंग अभिनेता कायमच त्यांना फिटनेस गुरु मानतो. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाले आहेत. सध्या धर्मेंद्र अमेरिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT